आरवंद येथील गोशाळा आगीच्या भक्ष्यस्थानी
अनेक गायींचा जीव धोक्यात असताना गाववाल्यांनी धाव घेत वाचवले गायींचे प्राण
आगीचे कारण अस्पष्ट
नरेश कोळंबे-कर्जत
कर्जत तालुक्यातील आरवंद येथील गोशाळा अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून सदर घटनेची माहिती मिळताच कर्जतचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांना कळताच त्यांनी तत्परता दाखवत त्या जागी अग्निशमन दलाची गाडी पाठवली असून आग विझविण्याचे काम चालू आहे.
सदर गोठ्यात १०० च्या आसपास गायी असून गोठ्याच्या बाहेरील भागात असलेल्या गुरांच्या चाऱ्याला भागाला नकळत पणे बाहेरून आग लागली . त्याचे कारण अद्याप कळू शकले नसल्याने हा घातपाताचा विषय असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सदर गो शाळेला सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. गावातील तरुणांनी आग लागलेल्या ठिकाणी धाव घेत सर्व गायी आणि वासरांना गो शाळेच्या बाहेर काढल्याने सर्व गायींचे प्राण वाचले आणि तत्परतेने आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याची फवारणी सर्व पेटलेल्या पेंढ्यावर केल्याने आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहचल्याने कर्जतचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांचे देखील गावातील लोकांनी आभार मानले.
आग दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लागली होती गावातील तरुणांना माहिती कळताच त्यांनी सदर ठिकाणी धाव घेत गायी आणि वासरांना गोठ्यातून बाहेर काढले त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. आगीचे कारण काही कळू शकले नसले तरीही गो शाळेचे अतोनात नुकसान झाले असून अनेक पत्रे फुटले असून गुरांचा चारा जाळला गेला आहे.
संतोष मोडक ( ग्रामस्थ आरवंद)