कडाव ग्रामपंचायतीच्या नळ पाणी योजनेस 6 कोटी 50 लाख 94 हजार 388 रुपये
संजय गायकवाड-कर्जत
आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून जलजीवन मिशन योजने अंतर्गत कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायतीस 6 कोटी 50 लाख 94 हजार 388 रुपये किंमतीच्या अंदाजपत्रकास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायतीची वस्तुस्थिती विचारात घेता नळ पाणीपुरवठा योजना ही 55 लिटर दरडोई दर दिवशी क्षमतेच्या 5905 रुपये दरडोई खर्च असलेल्या 6 कोटी 50 लाख 94 हजार 388 रुपये किमतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.