मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार
महाराष्ट्र मिरर टीम
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आडोशी गावाजवळ सहा वाहनांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला यात दोन ट्रकच्या मध्ये अडकलेल्या स्विफ्ट कारमधील चार जण जागीच ठार झालेत तर 9 जण जखमी झालेत ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने हा विचित्र अपघात झाला.अपघाताची घटना समजताच खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, अपघातग्रस्तांच्या मदतीला टीम आणि इतर यंत्रणांनी मदत केली,अपघात घडल्या नंतर वाहतूक कोंडी झाली होती अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात येऊन जखमींना एमजीएम हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार
2/14/2022 08:57:00 PM
0
Tags