कर्जतमध्ये आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी काम करणार-प्रिया दत्त
मोफत मेगा कॅन्सर तपासणी शिबीराचे प्रिया दत्त यांनी केलं उद्घाटन
आदित्य दळवी-कर्जत
इनर व्हील क्लब ऑफ कर्जत ,नर्गिस दत्त फाउंडेशन आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्या संयुक्त विदयमाने मोफत मेगा शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं.या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार प्रिया दत्त यांनी केलं. त्यावेळी खासदार प्रिया दत्त बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार सुरेश लाड,प्रतीक्षा लाड,सरपंच संतोष सांबरी,प्रांत अजित नैराळे,तहसीलदार विक्रम देशमुख, इनर व्हीलच्या मोनिका बडेकर, यांच्यासह इनर व्हील ऑफ कर्जतच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कॅन्सर स्क्रिनिंग प्रोस्टेड स्पेसिफिक, अँटीजेन टेस्ट सर्व्हीकल पॅप स्मिअर टेस्ट,डोके आणि मान स्क्रिनिंग,मोफत औषधे, स्त्रीरोग तपासणी आणि शस्त्रक्रिया, सीबीसी रक्त तपासणी, दमा आणि copd साठी चाचणी आदी तपासण्या या शिबिरात करण्यात येत असून हे शिबीर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे.