भोईवाडा-दासगाव येथे पारंपारिक होडी स्पर्धेचे आयोजन
नितेश लोखंडे-दासगाव
महाड तालुक्यातील दासगाव भोईवाडा येथे भोईराजा माझा, दर्याचा राजा ग्रुप आणि श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप यांच्या वतीने भोईवाडा दासगाव येथे रविवारी पारंपरिक होडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.तसेच लहान मुलांसाठी चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेसाठी मुंबई तील चाकरमानीआणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.पारंपारिक होडी स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे
स्पर्धा आयोजन करण्यामागे ऐतिहासिक कारण असल्याचे स्पर्धेचे आयोजक अक्षय मिंडे यांनी सांगताना ते पुढे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दळणवळण करण्यासाठी या दासगाव बंदराचा वापर व्हायचा हाच धागा पकडून आम्ही भोई समाज या बंदरात पारंपारिक होडी स्पर्धेचे आयोजन करतो.दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवत असतो.यावर्षी आम्ही सगळ्यांनी मिळून रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले असून त्या स्पर्धेला बालगोपालांनी भरभरून प्रतिसाद दिला.या स्पर्धसाठी मुंबईतील चाकरमानी, ग्रामस्थ मोठया प्रमाणात हजर होते.