श्रीवर्धनला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित हळदीकुंकू व होममिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद
विजय गिरी-श्रीवर्धन
हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांची उत्स्फूर्त उपस्थितीहोती याच कार्यक्रमात पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुमारे 1800 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ,खूप सुंदर नियोजन बद्ध खेळात होम मिनिस्टर चा मान सौ इशा आतिष भोकरे यांना मिळाला भोकरे यांना मानाची पैठणी नाम अदितीताई तटकरे व प्रमुख पाहुण्या सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली उपविजेत्या सौ सुरेखा चित्ते यांना चांदीची नथ बक्षीस देण्यात आली तसेच उत्कृष्ठ उखाणा ठरलेल्या सो रिद्धी करंजकर यांना देखील बक्षीस देण्यात आले ,तर सहभागी सर्व स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आल्या .कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्या सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी व नाम अदितीताई सोबत फोटो काढण्यासाठी लहान मुली तसेच महिलावर्गाची झुंबड उडाली होती .शिस्तबद्ध सुनियोजित कार्यक्रम श्रीवर्धन कारणांसाठी राबविल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते ,तसेच नाम .अदिती ताईंना धन्यवाद देत होते .