पोलीस मिनीबस घुसली चहाच्या टपरीत
खांब कोलाड मार्गावर घडली घटना
चार कर्मचारी जखमी, धारकाचे मोठे नुकसान
श्याम लोखंडे -कोलाड
या बाबत सविस्तर माहिती खांब कडून कोलाड कडे जाणारी पोलीस मिनीबस गाडी क्र. एम. एच.०६ के ९९३० ही शुक्रवारी 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता सदरच्या मार्गावरून प्रवास करीत असता यावरील वहान चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे सदर घडलेल्या आपघात घटनेत चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर कोलाड आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ताबडतोब उपचारासाठी हलविण्यात आले.
जखमीचे नाव- 1) पोहवा /91 चव्हाण किरकोळ 2)पोशी /825 बोरकर किरकोळ 3) पोशी 859 पांचाळ किरकोळ 4) पोशी/992पोशी पांचाळ किरकोळ 5)पोशी /8486 दळवे मुकामार ) पोशी /1426 धुळगडे मुकामार 7)पोशी /986 चव्हाण मुकामार 8)पोशी 899 लहारे मुकामार 9)पोशी 1039 मुसळे मुकामार 10)पोशी /1204 शेटकर मुकामार .
वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील पोलीस मिनी बस क्र एम एच 06 के 1930 वरील चाळक संजय अण्णा चव्हाण पोहवा /91 रा. गोरेगाव ता. माणगाव यांनी आपल्या ताब्यातील वाहन खांब बाजूकडून माणगाव बाजूकडे मुंबई-गोवा हायवे रोड वर चालवून घेऊन जात असताना मिनी बस रोडच्या साईडला जाऊन सद्गुरु चहा टपरीत घुसून बाजूला असलेल्या नारळाच्या झाडास ठोकर मारून अपघात झाला .
सदरच्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिजिट मार्गदर्शन विभागाचे ए एल पोसई घायवट यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची मो.अ. न. 2/2022 नोंद करत अधिक तपास करत आहेत .