केबुर्ली गावातील महिला व ग्रामस्थ कित्येक दिवस पाणी मिळत नसल्याने आक्रमक
ग्रामस्थ संतप्त झाल्याने सरपंच गायब...
नितेश लोखंडे-महाड
रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गालगत महाड शहराच्या अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या केबुर्ली गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे.
जवळपास 2 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात कित्येक दिवस पाणी पुरवठा होत नसल्याने त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. तर एक पिण्याच्या पाण्याच्या टॕंकरला प्रत्येकी 400 रूपये मोजावे लागल्यामुळे संतप्त झालेल्या महिला आज रस्त्यावर उतरल्या.महिलां व ग्रामस्थ यांनी एल,एन,टी कंपनीच्या अधिकारी यांना घेराव घालून जाब विचारले असता एल,एन,टी कंपनीच्या अधिकारी यांना पाणीटंचाईबाबत जाब विचारला असता एल,एन,टी, कंपनीचे आलेले अधिकारी यांनी केबुर्ली ग्रामपंचायचे सरपंच हे आम्हाला सहकार्य करत नसल्याचे सांगितले.
गावासाठी अनेकदा कोटयवधी रूपयांच्या पाणी ,रस्ते ,गटार योजना राबवूनदेखील पाणी मिळत नसल्याबददल या महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली .नियमित घरपटटी आणि पाणीपटटी भरूनदेखील पाणी मिळणार नसेल तर यापुढे कर न भरण्याचा निर्धार या महिलांनी व्यक्त केला .