Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

बशीर एम. हजवानी फाउंडेशन आणि जमीय जमातुल मुस्लिमीन खेडचा कौतुकास्पद उपक्रम

बशीर एम. हजवानी फाउंडेशन आणि जमीय जमातुल मुस्लिमीन खेडचा कौतुकास्पद उपक्रम

 ओंकार रेळेकर-चिपळूण


देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त बशीर एम. हजवानी फाउंडेशन आणि जमीय जमातुल मुस्लिमीन खेड यांच्या  वतीने खेड,दापोली,मंडणगड मधील नागरिकांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर कुठेही उपचारासाठी रुग्ण घेऊन जायचे असेल तर मोफत रुग्णवाहिका सेवेचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती बशीर एम.फाउंडेशनचे प्रमुख प्रमुख बशीरभाई हजवानी,खेड जमिय जमातुल मुस्लिमीनचे सचिव जलाल कादिरी,आरिफ मुल्लाजी  यांनी दिली.

     मुंबईतील मुस्लिम जिमखाना येथे २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी बशीरभाई हजवानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याच वेळी हजवानी यांच्या लक्षात आले की या वर्षीच्या ७५ व्या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण आपल्या जन्मभूमितील बांधवांच्या सेवेसाठी काहीतरी केले पाहिजे आणि याच भावनेतून जमीय जमातुल  मुस्लिमीनचे सचिव जलाल कादिरी,आरिफ मुल्लाजी,रऊफ   खतीब,अनस पोत्रीक, दाऊद कादिरी,सिराजभाई पटेल,अताऊल्हाह तिसेकर,परवेज सर,नुर महंमद चौगुले यांच्याशी हजवानी यांनी चर्चा केली.या वेळी २६ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत खेड ,दापोली,मंडणगड मधील गरजवंत लोकांपर्यंत मोफत रुग्णवाहिका पोहचविण्याचा निर्णय घेण्यात आला .या नुसार २६ जानेवारी पासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे,कोकणातील सुप्रसिद्ध उद्योजक तथा खेड चे सुपुत्र जेएमबीआर  ग्रुपचे मुख्य बशीरभाई हजवानी यांच्या पुढाकाराने कोकणात सतत विविध प्रकारे मदतकार्य सुरू असते महापूर असो,कोरोना संकट असो,निसर्ग वादळ,तोक्ते वादळ,अपघात यासह अनेक संकट काळात स्वतः बशीरभाई हजवानी शासकीय मदतीच्या आधीच देवदूताची भूमिका बजावत आपल्या वतीने महापूर ,कोरोना संक्रमण काळात मदतकार्य करण्यात पुढे असतात बशीर एम, हजवानी फाऊंडेशनच्या माध्यमातून सहा रुग्णवाहिका आणि एक रेस्क्यू वाहनाचा लोकार्पण सोहोळा नुकताच महाड येथे पार पडला.

विविध आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण,अपघातातील रुग्ण,अचानक आजाराने गंभीर झालेले रुग्ण उचारासाठी मुंबई,पुणे,मिरज,कोल्हापूर,कराड,बेळगाव,रत्नागिरी आदी ठिकाणी दाखल होतात अशा रुग्णांना त्यांच्या उपचाराच्या ठिकाणी सुखरूप पोहचविण्याची जबाबदारी अगदी मोफत स्वरूपात  रुग्णबशीर एम. हजवानी फाउंडेशन आणि जमीय जमातुल मुस्लिमीन खेड यांनी घेतली आहे. या तीन तालुक्यातील  गरजवंत रुग्णांना मोफत रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी 

९४२१९६९७९८,७७९८३२१५३३,९८८१२८८८७८,९५२१९७०९७० या नंबरवर संपर्क करावा असे 

बशीर एम हजवानी फाउंडेशन आणि जमीय जमातुल मुस्लिमीन खेड यांच्या वतीने जलाल कादिरी,आरिफ मुल्लाजी,रऊफ खतीब यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies