गीता पालरेचा झाल्या प्रतिष्ठेच्या पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष
आरिफ मिनियार उपनगराध्यक्ष बिनविरोध निवड
विनोद भोईर-पाली
प्रतिष्ठेच्या पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गीता पालरेचा यांना मिळाला आहे. बुधवारी दिनांक 9 रोजी शिवसेनेचे सचिन जवके यांनी नगराध्यक्ष पदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे गीता पालरेचा यांचा एकच अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे गीता पालरेचा या बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या आहेत. तर शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते आरिफ मणियार यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे.
गुरुवारी (ता.10) याची अधिकृत घोषणा करण्यात आल्याची. माहिती पाली नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंगाई साळुंके यांनी दिली. पालरेचा यांची नगराध्यक्ष पदासाठी , तर आरिफ मणियार यांची उपनगराध्यक्ष पदी निवड होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेकाप आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.