विजेचा शॉक लागून ३० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
महाड तालुक्यातील जिते ग्रामपंचायत हद्दीतील घटना
नितेश लोखंडे-महाड
मिळालेल्या माहितीनुसार दिपाली नितीन साळुंखे वय ३० रा. सोलमकोंड, या आपल्या वडिलांच्या घरी जिते या गावी आली असता सकाळी १०:३० च्या सुमारास आपल्या मुलांसाठी हिटर लावून पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. थोड्याच वेळात पाणी गरम झाले आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी दिपाली हिने त्या गरम पाणी करण्यासाठी हिटर लावलेल्या बालदी मध्ये हात टाकला असता तिला मोठ्या प्रमाणात शॉक लागला. शॉक लागल्यामुळे दिपाली हिला महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरता आणली असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यू अशी करण्यात आली असून त्याचा अधिक तपास महाड एमआयडीसीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मारुती आंधळे व पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पांडुरंग शास्त्री हे करीत आहेत.