माणगांव बाजारपेठेत पिस्तुलाने गोळी झाडून खुनाचा प्रयत्न; एकजण गंभीर जखमी
रविंद्र कुवेसकर-माणगांव
याप्रकरणी गोळी लागुन जखमी झालेला शुभम याच्या सोबत असलेला दिपक राम किशोर यादव वय २४ या प्रत्यक्षदर्शी तरुणाने दिलेल्या फिर्यादी नुसार माणगांव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं २८/२०२२. भा .दं. वि. स कलम ३०७, ३४ व शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास माणगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक समद बेग हे करीत आहेत. हा गुन्हा घडल्याच्या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मा.अशोक दुधे साहेब यांनी तातडीने भेट दिली व पुढील तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस यंत्रणा देखिल स्पेशल क्राइम ब्रांच पथका-सह वेगाने कामाला लागली आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार, दि. १२/०२/२२ ला १२ वाजून १० मिनीटांच्या सुमारास कचेरी रोड येथील शारदा स्वीट्स दुकानासमोर शुभम जयवाल आणि दिपक यादव हे आपले सोनी मेडीकल दुकान बंद करून कचेरी रोड वरून घरी पायी चालत जात असताना शारदा स्वीट मार्टचे समोर आले वेळी त्यांच्या समोर एका पल्सरवर दोन अनोळखी इसम बसलेली मोटारसायकल आली व त्यांनी इंदापूरला जाण्याचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली इतक्यात शुभम जैसवाल रस्ता दाखवत असताना मोटारसायकलवर मागे बसलेल्या इसमाने पिस्तूलची नळी रस्ता दाखविणाऱ्या शुभम जैसवाल वरती तानत त्याच्यावर पोटावर उजव्या बाजुस फायर केला आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने इंदापूर बाजूला पळ काढला. यामध्ये शुभम गंभीर जखमी झाल्याने त्याला मुंबई येथे उपचारासाठी नेले आहे.