वहिवाट, पाणवठे अडविल्याच्या विरोधात विडसई, वाफेघरकरांचा उपोषणाचा इशारा
विनोद भोईर-पाली
संस्थेच्या विरोधात आक्रमक झालेल्या वाफेघर, विड्सई ग्रामस्थांनी आता 'दंड थोपटले आहेत. सनदशीर व कायदेशीर मार्गाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येथील उपोषकर्ते ग्रामस्थ सुधीर वाघमारे यांच्यासह राजेश बेलोसे व अन्य ग्रामस्थांनी संस्थेविरोधात दि. ०७ फेब्रुवारी रोजी
पाली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाच्या प्रतं राज्याचे महसूलमंत्री, कोकण विभागीय , आयुक्त, पोलीस अधीक्षक रायगड, प्रांताधिकारी, पालीसुधागड तहसीलदार, सहाय्यक निबंधक पाली सुधागड यांना देण्यात आल्या आहेत. वसुधा संस्थेकडून वारंवार शासन आदेश व नियमांची पायमल्ली व मनमानी कारभार होत असल्याचा गंभीर आरोप राजेश बेलोसे व सुधीर वाघमारे यांनी शनिवारी पालीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय. यावेळी कागदपत्रे सादर करीत संस्थेच्या कामकाजावर ग्रामस्थानी आक्षेप घेतला. यावेळी ग्रामस्थ राजेश बेलोसे व सुधीर वाघमारे यांनी सांगितले की वसुधा सामाजिक वनीकरण संस्थेत चालू असलेल्या अनधिकृत बांधकामासबंधी दि.१०/०८/२०२१ रोजी पाली तहसीलकार्या लयासमोर आमरण उपोषण केले होते, यांनी दिली.
या आंदोलनाची दखल घेऊन दि. १४/०८/२०२१ रोजी पाली तहसीलदार यांनी कारवाई करून संस्थेचे अनधिकृत बांधकाम पाडले होते. मात्र प्रशासनाच्या या कारवाईनंतर देखील संस्थेने पुन्हा त्याच ठिकाणी बांधकाम चालू केलेले आहे. ही हुकूमशाही आम्ही चालू देणार नाही, असा इशारा पत्रकार परिषदेत राजेश बेलोसे, सुधीर वाघमारे, अमोल कांबळे, गणेश चव्हाण, यांनी दिला.
तक्रारींच्या अनुषंगाने वसुधा सामाजिक वनीकरण संस्थेला सुरू असलेले बांधकाम बंद करण्याची नोटीस बजावली आहे, याबरोबरच येथील वहिवाटीचे रस्ते अडवू नयेत अशा तोंडी व लिखित सूचना दिलेल्या आहेत. तक्रारदार ग्रामस्थ व संस्थेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. यापुढेही दोन्ही पक्षांना एकत्रित बोलवून सामंजस्य पणाने तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती दिलीप रायन्नावार, तहसीलदार पाली सुधागड यांनी दिली