कडावमध्ये भव्य आरोग्य शिबीर, आयुर्वेदिक उपचारावर भर
संजय गायकवाड-कर्जत
कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रमुनी मोरे, प्रमोदीनी शेट्टी, आंबिवली प्राथमिक केंद्राचे डॉ. रमेश कोकरे आदी उपस्थित होते. सुमित श्रीमाळ यांनी स्वागत केले. प्रमोदिनी शेट्टी यांनी प्रास्ताविकात शिबिराबद्दल माहिती दिली.
सुमित श्रीमाळ यांनी आपल्या मनोगतात, 'या शिबिराचा ग्रामीण भागातील लोकांना लाभ व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असून आयुर्वेदिक औषधींचे महत्व संपूर्ण जगाला पटले आहे. त्याचे महत्व पटवून देण्याचे काम आम्ही करीत असून भविष्यात पांढऱ्या कोडा वरील यशस्वी उपचार करण्यासाठी आम्ही येथे केंद्र उभारणार आहोत.' असे स्पष्ट केले. या आरोग्य शिबिरात मधुमेह, कुष्ठरोग, हाडांचे आजार, संसर्गजन्य रोग आदींची तपासणी होत आहे. डॉ. बिना जनवीर, डॉ. सूरज सिंग, डॉ. समीर शेख, डॉ. अमोल सातव आदी रुग्णांची तपासणी करीत आहेत. या शिबिरास परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.