कर्जत भात गिरण अध्यक्षपदी सिताराम मंडावळे
संजय गायकवाड-कर्जत
संस्थेच्या अध्यक्षपद रिक्त असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार अधिकारी ए. ए. मदने यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली, अध्यक्षपदासाठी सिताराम मंडावळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मदने यांनी मंडावळे हे अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.
यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन परशुराम तथा अप्पा घारे, कशेळे भात गिरणीचे चेअरमन तानाजी मते, कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक शरद लाड, तसेच संचालक बाळू थोरवे, विनायक गोगटे, चंद्रकांत मांडे, जयवंत देशमुख, शिवाजी भगत, रविंद्र मांडे, छाया वेखंडे, अरुण लाड, सचिव अनिल देशमुख, उपसचिव दयानंद पाटील यांच्यासह विनय वेखंडे, नारायण भोईर हरिश्चंद्र ठोंबरे, वेणगाव सहकार सोसायटीचे अध्यक्ष नारायण मोडक उपस्थित होते.