साताऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी ४८ कोटींचा निधी मंजूर : खा.उदयनराजे भोसले
प्रतीक मिसाळ -सातारा
सातारा नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या भागाच्या विकासासाठी सातारा नगरपरिषदेने सादर केलेल्या ४८ कोटींच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे . या निधी पैकी पहिला हप्ता लवकरच नगरपरिषदेला प्राप्त होईल , अशी माहिती सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खासदार श्री . छ . उदयनराजे भोसले यांनी दिली . याकामी नगरविकास मंत्री ना . एकनाथ शिंदे यांची श्री . छ . उदयनराजे भोसले यांनी समक्ष भेट घेवून पाठपुरावा केला होता . गत महिन्यात ५८ कोटी रुपयांच्या प्रशासकीय इमारतीस मंजूरी मिळाली आहे.
आज ४८ कोटींच्या हद्दवाढ भागातील कामांना मंजूरी मिळाली आहे .
- हद्दवाढ भागातील , ३.७५ मिटर रुंदीचे रस्ते ६ कोटी ५६ लाख
- ५.५० मिटर रुंदीचे रस्ते रुपये ७ कोटी ४५ लाख .
- ७.५० मिटर रुंदीचे २ कोटी ९ ४ लाख रुपयांचे रस्ते .
- हद्दवाढ ३.७५ मिटर रुंदीचे रुपये ४ कोटी ७३ लाखांचे नवीन रस्ते .
- ५.५० मिटर रुंदीचे ३ कोटी ३३ लाखांचे नवीन रस्ते .
- ७.५० मिटर रुंदीचे नवीन रस्त्यांसाठी रुपये ८८ लाख रुपये ४०० बाय ६०० मापाचे आरसीसी गटर्स रुपये ६ कोटी ७० लाख .
- ६०० बाय ७५० मापाचे आरसीसी गटर्स करणेकामी रुपये ३ कोटी ४७ लाख .
- विविध ठिकाणी स्ट्रीट लाईटस उभारणेकामी रुपये ३ कोटी ४८ लाख
- मोकळ्याजागांचा विकास आणि वृक्षारोपण करणेकामी रुपये ४ कोटी ६३ लाख
सुमारे ४ कोटी ३३ लाखांचे अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण अशी विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत . आता राज्यशासनाकडून याकामी ४८ कोटींच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे . लवकरच यापैकी पहिल्या हप्त्याचा निधी नगरपरिषदेस प्राप्त होणार आहे . हद्दवाढ भागाचा समतोल विकास साधताना , बचतगटांच्या माध्यमातुन महिला सक्षमीकरण , रोजगार निमिर्ती , बाग - बगिचे आणि उद्याने विकसित करणे , दर्जेदार रस्ते - गटर्स , पाईपड्रेन , स्ट्रीट लाईटस् इ . कामांबरोबरच शाश्वत विकासाची कामे मार्गी लावण्यात येतील . मंजूर हद्दवाढ विकास प्रकल्पानुसार प्रशासकीय कार्यवाही करुन , लवकरच कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याचे खासदार श्री . छ . उदयनराजे भोसले यांनी सांगितले . हद्दवाढ भागातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत ही आमची समाजकेंद्रीत धारणा आहे . आमच्या या प्रयत्नांना यश आले आहे , अशी प्रतिक्रीयाही खासदार श्री . छ . उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.