गुढीपाडवा
मिलिंदा पवार -सातारा
गुढीपाडवा हा सण सामाजिक एकोपा कायम राहावा हेच सांगतो कारण सगळ्यांनी गुढी उभारून स्वागत केले पाहिजे याचा अर्थ आपण एकट्याने करण्याचे काम नाही. समाजात कोणताही भेदभाव नाही सर्वजण समान आहे समानतेच्या पातळीवर असे उत्सव साजरे करीत असतो . गुढी हे त्याचे झाले प्रतीक. पाडव्यापासून नवीन व्यवसायाच्या आरंभ करणारे अनेक जण असतात नवीन वस्तूंची खरेदी, नवीन वाहन, वास्तुप्रवेश असे कार्यक्रम या दिवशी केले जातात अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील अनेक शहरात नववर्षाच्या मिरवणुका काढून हा सण साजरा केला जातो या मिरवणुकात युवकांचा असणारा उत्साह, आकर्षक वेशभूषा असणारा युवती, वेगवेगळ्या खेळांचे प्रदर्शन समाजात असणाऱ्या विविध संघटनांचा सहभाग एकोप्याचे दर्शन घडवितात चैत्र महिना म्हणजे तसे म्हटले तर पावसाळ्याला राहतात फक्त दोन महिने या दोन महिन्यांच्या काळात तयारी करावयाची ती खरीप हंगामाची मशागत करणे बी बियाणे खतांची खरेदी शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचे दुरुस्ती ही कामे या कालावधीत केले जातात गेल्या तीन-चार वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमी पडणाऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे यंदा तर त्याची तीव्रता अधिक आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरसुरू केलेल्या सर्व कामांना यश मिळेल हीच अपेक्षा