'महाराष्ट्र केसरी' ची गदा जिंकलेला कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील आणि उपविजेता पैलवान मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
- पृथ्वीराज पाटील, विशाल बनकर, पुण्याचा हर्षद कोकाटे, वाशिमचा सिकंदर शेख हे नव्या दमाचे पैलवान
- महाराष्ट्र कुस्तीची गौरवशाली परंपरा पुढे नेतील
- -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास
मिलिंद लोहार - सातारा
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघाने आयोजित केलेल्या ६४ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत 'महाराष्ट्र केसरी' ची गदा जिंकलेला कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील आणि उपविजेता पैलवान मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र केसरी'च्या अंतिम स्पर्धेत पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा मिळवलेला विजय त्याच्या लढाऊ वृत्तीचे व दृढनिर्धाराचे प्रतिक आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या पृथ्वीराज पाटील सैन्यदलात सेवा करीत आहे, त्याने जिंकलेल्या 'महाराष्ट्र केसरी' पुरस्काराने महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा गौरव वाढणार आहे. पृथ्वीराज पाटील, विशाल बनकर, पुण्याचा हर्षद कोकाटे, वाशिमचा सिकंदर शेख हे नव्या दमाचे पैलवान महाराष्ट्र कुस्तीची गौरवशाली परंपरा पुढे नेतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.