ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेत बगाडाची प्रथा
मिलिंदा पवार - खटाव
खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा उत्साहात संपन्न झाली या गावांमध्ये अनेक वर्ष नवसाच्या बगाडाची प्रथा आहे. हे बगाड नवसाला पावते अशी येतील भाविकांची श्रद्धा आहे. गेली २ वर्ष कोरोना संसर्गजन्य आजार यामुळे ही प्रथा बंद होती .
आता कोरोनाचा प्रार्दूभाव कमी झाल्यानंतर ग्रामस्थ आणि नवस बोलणारा लोकांनी यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली आहे. चालू वर्षी 20 पेक्षा अधिक लोकांनी यात सहभाग घेतला आहे त्यांना सुतार, पाटील आणि इतर बलुतेदार सहकार्य करत असतात. मातंग समाजास या ब गाड फिरवण्याचा मान आहे. आत्तापर्यंत 21 बगाड झाली पहिला बगाड घेण्याचा मान पाटील वाड्यास असतो.
https://youtu.be/mBGRKqPLxJA
खेळणी, पाळणे, मेवा मिठाई ची दुकाने मोठ्या प्रमाणावर आली होती तर चाकरमान्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती भेरवनाथाचा रथ दर्शनासाठी ठेवण्यात आला होता . भाविक रथाचे दर्शन घेऊन भाविकांनी हजारो रुपयांची देणगी अर्पण केली आहे. याशिवाय गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात करण्यात आली . याशिवाय गुलालाची उधळण आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात देवाचा छबिना काढण्यात आला .यात्रा कमिटी ग्रामपंचायत, सोसायटी पदाधिकारी आणि मान्यवर कार्यकर्त्यांनी यात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.