हारवित गावामध्ये समुद्राच्या खाडीपट्टीवर आढळला मृतावस्थेत महाकाय मासा
सर्फराज दर्जी -श्रीवर्धन
तालक्यातील दिघी पोर्टाला लागून असलेल्या हारवित गावातील खाडीच्या किनाऱ्यावर भल्या मोठ्या आकाराचा व्हेल प्रजातीचा मासा आढळून आल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे हारवित गावातील नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केलीय.
हारवित येथील समुद्रकिनारी आज, शुक्रवारी सकाळी महाकाय मासा मृतावस्थेत आढळला. ग्रामस्थांच्या मते हा मासा व्हेल प्रजातीचा असण्याची शक्यता आहे.हरवित खाडी समुद्रकिनारी असणाऱ्या ग्रामस्थांना सकाळी महाकाय मासा दिसला. ग्रामस्थांनी पाहणी केली असता तो मृतावस्थेत असल्याचे लक्षात आले. हा मासा अंदाजे ३० ते ४० फूट लांब असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.या माशाचा मृत्यू काही क्षणापूर्वी झाला असल्याची शक्यता असून, समुद्राच्या प्रवाहासोबत हा मासा वाहत किनाऱ्यावर आला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, या माशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजू शकलेले नाही.
मात्र एवढ्या मोठ्या महाकाय माशाचा मृत्यू झाल्याने प्राणीप्रेमींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे