पार्वतीबाई राणे यांचे निधन
कर्जत: कर्जत तालुक्यातील हालीवली गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ ह.भ.प. पार्वतीबाई गणेश राणे यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी 12 एप्रिल रोजी राहत्या घरी निधन झाले, त्या काही दिवस आजारी होते ,त्यांचे 92 वर्ष वय होते, त्या शेवटपर्यंत वारकरी संप्रदायाच्या सदस्य होत्या.
अतिशय कठीण व गरीब परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांचे योग्यरीत्या संगोपन केले.
त्यांच्या पश्चात चार मुले ,बारा नातवंडे ,असा मोठा परिवार आहे. अंतयात्रा समयी तालुक्यातील विविध पक्षीय नेते कार्यकर्ते व हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते, यावेळी सर्वांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.