नृत्य ही साधना
जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने.....
विशेष लेख - प्रियांका ढम - पुणे
नृत्य कलेला आणि नृत्य कलावंताला जगमान्यता मिळावी, या कलेचा उत्कर्ष आणि अधिकाधिक प्रसार व्हावा आणि तिला राजाश्रय मिळावा हा उद्देश, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करण्यामागे आहे.
नृत्य ही कला अनेक कलाकारांच्या उपजीविकेचे साधन बनली आहे . नृत्य ही साधना आहे यातून आनंद ,योग,व्यायाम ,ताल लय सर्वच गोष्टी साध्य होतात नृत्यांमधून अनेक पैलू समोर येतात महाराष्ट्राची लावणी नृत्य तर प्रत्येक जिल्हा प्रांत निहाय नृत्याचे देखील वेगळे वेगळे प्रकार पडत गेले जसे की मणिपुरी मणिपुरी नृत्य कथक ,ओडिसी ,कुचीपुड़ी , कथकली ,
मोहिनीअट्टम असे वेगळे वेगळे प्रकार आणि त्यांची वैशिष्टे आहेत. भरतनाट्यम हे सर्वात प्राचीन नृत्य शैली आहे नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे. तसेच,आनंद व्यक्त करणे, दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला. नृत्यातून आपण आपली भावना व्यक्त करू शकतो. या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त्या नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली. नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.विविध प्रांतात नृत्याचीवेगळी परंपरा आहे . असे अनेक दिग्गजांनी आणि भारतीय महिलांनी कथक ,भरतनाट्यम यामधे नृत्य विशारद या पदव्या देखील मिळवल्या आहेत