रोहित आणि रक्षिता बनसोडे यांचा सत्कार
वृक्ष लागवडीमध्ये दोघा बहिण भावाचे मोठे योगदान
मिलिंदा पवार - वडुज
भारताचे वृक्षपुरूष पद्मश्री जादव पाईंग यांच्या सोबत माणदेशी वृक्ष पुत्र रोहित बनसोडे यांचे हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
शिवम आध्यात्मिक व संस्कृतीक विकास प्रतिष्ठान घारेवाडी कराड बलशाली युवा ह्रदय संमेलन आयोजित कार्यक्रमात कृष्णा चॅरिटेबल ट्रष्टचे अध्यक्ष सुरेश भोसले यांच्या हस्ते व शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख व वृक्षपुरूष पद्मश्री जादव पाईंग आदी. मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
मुसीबतें आऐंगी जाएंगी रोहित जी कार्य रूखना नहीं चाहीऐ,, बलशाली भारत को. इस देश की मिट्टी को आप जैसे प्रयत्नवादी युवाओ की जरूरत है..असे उद्गार पाईंग यांनी रोहीत बाबत काढले.मला कुणी काय दिले यापेक्षा मी श्वास पेरून सर्वांना मोकळा श्वास निर्माण करून दिला यात मी धंन्य झालो... असेही पदमश्री जाधव पाईंग म्हणाले .