Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सांगलीत प्रथमच 13 ते 18 मे धर्मवीर संभाजीराजे जन्मोत्सव

 सांगलीत प्रथमच 13 ते 18 मे धर्मवीर संभाजीराजे जन्मोत्सव

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची उपस्थिती : होणार जागर मराठी अस्मितेचा

उमेश पाटील -सांगली


येथील नवहिंद प्रतिष्ठान तर्फे दि. १३ मे ते १८ मे या दरम्यान धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ मे रोजी बागणीच्या किल्ल्यातून सहा फूटी शंभुराजेंचा भव्य पुतळा मिरवणुकीने सांगलीत आणून जन्मोत्सवाला प्रारंभ होणार आहे तर १५ रोजी पर्यावरणमंत्री व युवाह्रदयसम्राट आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांनी दिली. 

 सांगलीत प्रथमच शंभुराजेंचा असा भव्य दिव्य जन्मोत्सव साजरा होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक (जुना स्टेशन चौक, जकात कार्यालयाजवळचे पटांगण) येथे सर्व समारंभ होणार आहे. यानिमित्ताने पाच दिवस मराठी अस्मितेचा जागर विविध कार्यक्रमाद्वारे करुन १८ मे रोजी पारंपरिक मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. असेही शंभोराज काटकर यांनी सांगितले. 

   या जन्मोत्सव समारंभाचे कार्यक्रम असे आहेत, १३ मे रोजी सकाळी ११ वाजता बागणी येथील भुईकोट किल्ल्याचे गडपूजन ग्रामस्थांच्या हस्ते. त्यानंतर प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिरापासून भव्य शोभायात्रेला प्रारंभ.  बागणी ग्रामस्थ व सर्व युवकंं मंडळांनी प्रत्येक दारात रांगोळी व प्रत्येक घरावर भगवा झेंडा लावून शंभूराजेंच्या पुतळ्याचे चौकाचौकात स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. या शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांचा समावेश असेल. बागणीनंतर दुधगाव येथे मुख्य चौकात, त्यानंतर कवठेपिरान येथील विविध चौकात, समडोळी कमान येथे आणि सांगलीवाडी येथे स्थानिक शंभुराजे प्रेमी नागरिक, युवक मंडळे स्वागत करतील. त्यानंतर सांगली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शोभायात्रा आणून तेथून स्टेशन चौकात येईल. १३ रोजी रात्रीच मुर्ती प्रतिष्ठापना करुन शेकडो महिलांच्या उपस्थितीत जन्म काळ व अंगाई सोहळा पार पडेल. 

१४ मे  रोजी धर्मवीर जन्मोत्सवानिमित्त दिवसभर व रात्रीही शहरातील विविध युवा मंडळे व नागरिकांना दर्शनाला खुले ठेवले असून यानिमित्ताने सेल्फी पॉईंट ही निर्माण केला आहे.  

१५ मे सकाळी ११ वा.पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शंभूराजेंच्या पुतळ्याचे पूजन व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती शिल्पाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. यावेळी राज्य मंत्रीमंडळातील मान्यवर मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.  

१५ मे रोजीच सायं. ६ वा. ख्यातनाम वक्ते प्रा. नितीन बानुगडे-पाटील सर यांचे संभाजीराजे व मराठी अस्मिता याविषयावर व्याख्यान होणार आहे. तत्पूर्वी सुमित डान्स अकॅडमीच्या कलाकारांचा "पावनखिंड रणसंग्राम" हा नृत्य- नाट्य आविष्कार सादर होणार आहे. 

१६ मे सायं ५ वा. खेळ पैठणीचा भाऊजींसह असा महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला असून खास आकर्षण राजा राणीची गं जोडी फेम भाऊजी सुजीत ढाले पाटील हे उपस्थित राहणार आहेत. हास्य कलाकार वृषभ अकिवाटे व विज्ञान शिक्षक सरोज बाबर अँकरिंग करतील. या कार्यक्रमाच्या दरम्यानच मराठी बाणा दाखवून दिलेले *प्रसिद्ध अभिनेते किरण माने* यांचा महापौरांच्या हस्ते नागरी सत्कार आणि मराठी अस्मिता विषयी त्यांचे धारदार भाषण होणार आहे. 

१७ मे सायं ६ वा.सांगलीचे प्रसिद्ध शाहीर शाहीर देवानंद माळी आणि मंडळींचा पोवाडा आयोजित केला आहे. तर १८ मे भव्य दिव्य मिरवणूक पारंपरिक मार्गावरुन काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत तरुणांना आकर्षित करणारी वाद्ये, लेसर शो यांचाही समावेश असेल. असेही शंभोराज काटकर यांनी सांगितले. 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती

या निमित्ताने धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये महिंद्र चंडाळे संदीप ताटे सुरज चोपडे अरुण बाबर विश्वनाथ गवळी प्रसाद रीसवडे अविनाश कांबळे नितीन बाबर कैलास पवार गणेश घाडगे तेजस भंडारे राहुल हादगिने राहुल आनंदे निलेश जाधव विशाल शिंदे राजेश कदम अनिल शेटे प्रदीप कांबळे सचिन शिवजी प्रकाश निकम अविनाश यादव रसूल पेंढारी इमरान शेख यासीन मुजावर विजय काटकर बंडू शेवाळे संदीप रसाळे दीपक शिंदे सुधाकर गायकवाड रोहित मुळीक प्रशांत शिकलगार शंकर चांद कवठे किरण महिंद द्वारकेश ढगे जयवंत ढगे अक्षय पाटील सुरज चव्हाण विनायक घोरपडे संतोष मडिवाळ प्रवीण भोरे सुशांत साखळकर मंगेश जगताप रोहन वाल्मिकी सारंग पवार सुरेश साखळकर अमोल कांबळे

अभिजित पोरे आदी शहरातील विविध युवा मंडळांच्या प्रमुख पदाधिकारी यांचा समावेश आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समिती आणि नवहिंद प्रतिष्ठानचे कार्यकर्ते झटत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies