रायगड जिल्हा हादरला
दोन चिमुरड्यांना विष पाजून दोघांनी गळफास घेऊन केली आत्महत्या, पोलिसांना संशय
अलिबाग मधील हृदयद्रावक घटना
अमुलकुमार जैन - अलिबाग
दोघेही शिक्रापूर पुणे येथील रहिवासी असून 11 मे पासून अलिबागमध्ये एक मुलगा व मुलीसह फिरण्याकरीता आले होते. १६ मे रोजी सकाळ पासून त्यांच्या रूमचा दरवाजा उघडत नसल्याने तसेच काहीच हालचाल दिसून येत नसल्याने दुपारी 3 च्या सुमारास कॉटेज मालकाने दरवाजा उघडला असता मुलांचे मृतदेह बेड वर तर दोघांनी गळफास लावलेला दिसून आला. याप्रकरणी अलिबाग पोलिसांना कळवताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात नेले असून त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. कुणाल गायकवाड वय 31 वर्ष, प्रियांका संदीप इंगळे वय वर्ष 25, तर दोन लहान 3 वर्ष आणि 5 वर्षाच्या मुलांचा समावेश आहे.माऊली संदीप इंगळे हा तीन वर्षाचा मुलगा असून मुलगी भक्ती संदीप इंगळे ही पाच वर्षाची आहे दरम्यान यातील मृत पुरुष कुणाल हरविल्याची फिर्याद त्याच्या पत्नीने 1 मे रोजी शिक्रापूर पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदविली होती.पुढील तपास अलिबाग पोलिस करत आहेत.