चिपळूण नागरीच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभाग विजेता , लगान इलेव्हन उपविजेता
ही आयपीएल क्रिकेट स्पर्धा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक व उत्साहवर्धक ठरेल : सुभाषराव चव्हाण
ओंकार रेळेकर-चिपळूण
विजेत्या आणि उपविजेत्या संघास चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले.याप्रसंगी व्हाईस चेअरमन सुर्यकांत खेतले,मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्ना यादव, संचालक अशोकराव कदम, संचालिका सौ. स्मिताताई चव्हाण, संचालक गुलाब सुर्वे, रवींद्र भोसले, अशोक साबळे,सत्यवान म्हामूनकर,सोमा गुडेकर, संचालिका ऍड. नयना पवार , राजेंद्र पटवर्धन, मनोहर मोहिते, नीलिमा जगताप,चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव,मा.आ.रमेशराव कदम, जयदंथ खताते,सुरेश पवार, वैभव चव्हाण,महाडचे संदीप जाधव, काँग्रेसचे सुनील भाऊ सावर्डेकर, बाबा डोंगरे, मदन शिंदे, प्रकाश पत्की, अमोल सूर्वे, प्रमोद साळवी, प्रकाश साळवी, अनिल उपळेकर, अनिल लोटणकर, बशीर सय्यद, मोहन पटवर्धन, प्रकाश शिंदे, विलास सावंत, रमेश चाळके अविनाश आंब्रे आणि मंगेश पेंढाबकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सामनावीर आदित्य माळी,उत्कृष्ट फलंदाज शैलेश शिर्के,उत्कृष्ट गोलंदाज सुहास कडव ,क्षेत्ररक्षक हृषीकेश जडयाल म्हणून यांना गौरविण्यात आले.तसेच प्रत्येक संघाच्या कर्णधाराचा देखील सन्मान करून प्रोत्साहन देण्यात आले.
ही आयपीएल क्रिकेट स्पर्धा मार्गदर्शक व उत्साहवर्धक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करताना मनोरंजन, प्रेम व आपुलकी जपणारी आहे असे सुभाषराव चव्हाण यांनी सांगितले. संस्थेने चांगल्या उपक्रमाचे आयोजन करण्याचे काम केले आहे. चिपळूण नागरीचा अधिकारी व कर्मचारी वर्ग वर्षभर कामात व्यस्त असतो. मात्र, या सर्वांच्या कलागुणांना सिद्ध करण्याची या स्पर्धेच्या माध्यमातून संधी मिळणार आहे. उर्मी जागसुक करण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे, असे मत सुभाषराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.
चिपळूण नागरीच्या या दोन दिवसीय स्पर्धा आयपीएल धर्तीवर विद्युत रोषणाई,ध्वनीयंत्रणा,प्रेक्षक गॅलरी,मैदानाची आखणी,नियमबद्ध अचूक नियोजन,मान्यवरांचा योग्य वेळी सन्मान,फटाक्यांची आतषबाजी,नामवंत पंच आदी विविध कारणांमुळे देखणी अशी ठरल्याची प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या.या स्पर्धेत चिपळूण नागरी कर्मचारी इलेव्हन,पत्रकार इलेव्हन,आणि संचालक इलेव्हन यांचे प्रेक्षणीय सामने खेळविण्यात आले.
स्पर्धेचे यशस्वी नीटनेटके नियोजन करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव व सर्व कर्मचाऱ्यांचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी कौतुक केले. चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या संकल्पनेतून शाखाअंतर्गत क्रिकेट स्पर्धेला सन २०१७ पासून सुरुवात झाली. मात्र गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. यावर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने स्पर्धेचे नियोजन केले होते.
स्पर्धेसाठी पंच म्हणून राकेश मोरे, रवींद्र आदवडे, सुनील कुळे, विक्रम भोसले स्कोरर म्हणून नोंद करण्यासाठी प्रसाद लांबे आणि चेतन युट्युब लाईव्ह करण्यासाठी बारामतीतुन टॉस विनर टीम चे संदीप तावरे आणि सुदीप यांनी काम पाहिले तर स्पर्धेचे ओघवत्या शैलीत प्रशांत आदवडे,अमित आदवडे यांनी काम पाहिले.