Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

युद्धपातळीवर काम करून शहरात सुरळीत पाणीपुरवठा सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पालिकेच्या वतीने सत्कार

 युद्धपातळीवर काम करून शहरात सुरळीत पाणीपुरवठा सुरू करणाऱ्या  कर्मचाऱ्यांचा पालिकेच्या वतीने सत्कार

 ओंकार रेळेकर- चिपळूण

 
गोवळकोट पाण्याच्या मुख्य टाकीत जाणारी पाईपलाईन रविवारी सकाळी अचानक नादुरुस्त झाल्याने गोवळकोट रोड येथील नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल झाले या वेळी चिपळूण नगर पालिका पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी तातडीने पोहचून सुमारे सहा तास मेहनत घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करणाऱ्या कार्यतत्पर कर्मचाऱ्यांचा मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, उपमुख्याधिकारी अनंत मोरे यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी पालिकेच्या श्रावणशेठ दळी सभागृहात विशेष सन्मान करण्यात आला .

पेठमाप गोवळकोट मार्गावरून पालोजी बाग येथे गोवळकोट पाण्याच्या टाकीत जाणारी मुख्य पाईपलाईन रविवारी पहाटे अचानक नादुरुस्त (लिकेज) झाली या वेळेत नागरिकांचे  पाण्यासाठी मोठे हाल झाले या वेळी चिपळूण नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी तात्काळ येथे दाखल झाले सुमारे बारा फूट खोल आणि अकरा फूट रुंद खोली खोदून कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन सहा तासात  काम पूर्ण केले,एप्रिल महीन्यातही चिंचनाक,परकार चाळ मार्कंडी येथीही अशाच प्रकारची समस्या निर्माण झाली होती येथेही हे कर्मचारी पोहचून तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे,उपमुख्याधिकारी अनंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाणी पुरवठा पर्यवेक्षक नागेश पेठे यांच्या नियोजनाखाली पाणी पुरवठा विभागाने सदरचे काम पूर्ण केले .चिपळूण सायकलिंग ग्रुप ग्रुप ने सायकलिंग स्पर्धेत मोठा विक्रम नोंदविला आहे बहाद्दूरशेख नाका ते सोंनपात्र ३१ किलोमीटरचे अंतर काही वेळातच सर करणाऱ्या या ग्रुपचाही  सन्मान करण्यात आला चिपळूण सायकलिंग ग्रुप चे प्रमुख नगर अभियंता परेश पवार यांना मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले,रुपेश कदम,रुपेश हळदे,सुनील कदम,अनिल गमरे,राजन भोजने,योगेश सारवे, अजित जाधव,देवेंद्र सन्नाक, गौरव सावंत,अनिल सावंत,जेसीबी चालक नागराज भोजने आदी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा प्रसाद शिंगटे यांच्या हस्ते   सत्कार करण्यात आला.अल्पवेळेतच गोवळकोट विभागात पाणी पुरवठा सुरळीत करणाऱ्या पालिका कर्मचारी आणि प्रशासनाचे नागरिकांनी आभार मानले आहेत.यावेळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे,अनंत मोरे,प्रसाद साडविलकर,राजू जाधव आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies