शंभरावे अधिवेशन
भव्य मंडप उभारणीस प्रारंभ.. स्वागताध्यक्ष ना. यड्रावकरांनी केली पहाणी..
उमेश पाटील - सांगली
यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील यांनी ना. यड्रावकर यांना माहिती दिली. दिड लाख चौरस फूटाचा महामंडप.. सुमारे ५० ते ६० हजार लोकांची बैठक व्यवस्था, भव्य स्टेज, पार्किंग, लाईट व प्रवेशद्वार इ. ची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
सांगलीच्या इतिहासात प्रथमच इतक्या भव्य दिव्य प्रमाणात दक्षिण भारत जैन सभेचे अधिवेशन संपन्न होत असून जनजागृती संवाद बैठकांचा झंझावात पूर्ण झाला आहे. मोठ्या प्रमाणात जैन समाजातील लोकांची शिस्तबद्ध उपस्थिती हे या अधिवेशनाचे खास वैशिष्ट्य राहणार असेही ते म्हणाले.
यावेळी कार्याध्यक्ष सुरेश पाटील, ट्रस्टी राजेंद्र झेले, डॉ. अण्णासाहेब चोपडे, सुदर्शन हेरले, प्रशांत पाटील, शीतल पाटील, राजगोंडा पाटील गुमट आदि मान्यवर उपस्थित होते.