कर्जत तालुका समन्वय समितीची बैठक संपन्न
विविध कामांचा आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतला आढावा
शासन व लोकप्रतिनिधींनी एकत्रित आल्याशिवाय तालुक्याचा विकास साधता येणार नाही- आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन
दिनेश हरपुडे- कर्जत
- कोविड कालावधीमध्ये जवळपास पंधराशे कुपोषित बालकांना पोषण आहाराचे कीट देण्यात आले, असे सांगण्यात आले.
- केंद्र व राज्य सरकार व इतर विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे व यासोबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार महोदय यांनी दिल्या.
- या निमित्ताने कोविड कालावधीत ज्या सामाजिक संस्थांनी मदत केली, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
- नसरापूर चिंचवली सालवड या भागात सुद्धा एसटी सेवा चालू करण्यात यावी अशी सूचना आगार व्यवस्थापकांना देण्यात आली.
- खरीप हंगामाकरिता त्वरित उपयुक्त खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी. असे आदेश कृषी अधिकाऱ्यांना दिले गेले.
- जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ज्या कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. परंतु कामे चालू झाली नसल्याने ती कामे त्वरित चालू करण्याचे आदेश देण्यात आले.
- वाढीव वीजबिलांच्या संदर्भात अनेक लोकांच्या तक्रारी आहेत, याच्याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावे. अशा सूचना उपअभियंता यांना देण्यात आल्या.
- वनहक्क दाव्यासंदर्भात जी प्रकरणे प्रलंबित आहेत, ती त्वरीत मार्गी लावावीत.
- घरकुल योजनेसंदर्भात जो खरा लाभार्थी आहे, त्याला योजनेचा लाभ शक्यतो मिळत नाही. त्याचे सर्वेक्षण करण्यात यावे..
शेवटी कोविड कालावधीत सुद्धा आमदार थोरवे यांनी मतदार संघात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी मांडण्यात आला.
कोविड कालावधीत जवळपास तीनशे अकरा मृत व्यक्तींना प्रत्येकी पन्नास हजाराचे त्यांच्या कुटुंबीयांना मानधन देण्यात आले. कुटुंबात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याच्या पत्नीस प्रत्येकी हजार रुपये प्रति महिना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन चालू करण्यात आली आहे.अशी माहिती तहसीलदार यांनी दिली..
बैठकीस तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी साबळे, पोलीस निरीक्षक पत्की, इतर प्रशासकीय अधिकारी व समन्वय समितीचे सदस्य आदी उपस्थित होते...