मायणी वैद्यकीय महाविद्यालय प्रकरणी ईडी कडून कारवाई डॉ. एम. आर. देशमुख यांना अटक
मिलिंदा पवार - सातारा
मायणी वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यमान संचालक अरुण गोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मायणी येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारे यंत्रसामग्री साठी बँकेतून संचालक मंडळाने सुमारे 15 कोटी रुपये कर्ज स्वरूपात घेतले होते सदर रकमेतून त्याची खरेदी न करता संचालक मंडळाने बोगस बिले बँकेकडे सादर केली बँकेच्या कर्जाची रक्कम न भरल्यामुळे बँकेकडून वेळोवेळी वैद्यकीय महाविद्यालयास पत्रव्यवहार सुरू झाला बँकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता तेथे कोणत्याही वस्तूची खरेदी नसल्याचे दिसून आले. ही माहिती निदर्शनास आली तेव्हा तत्पूर्वीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक मंडळ बदलण्यात आले होते संबंधित कंपन्यांनी ही आपण वैद्यकीय महाविद्यालयाला कोणतीही बिले दिली नसल्याचे सांगितले आहे त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाविषयी गैरसमज होऊ शकतो. म्हणून आपण ही तक्रार तत्कालीन संचालक मंडळावर देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे या तक्रारीवरुन खरेदी प्रक्रियेत मनी लॉन्ड्रिंग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डॉक्टर एम आर देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई केली.