ट्रेलर टेम्पोला धडकला दोन्ही वाहने उलटली,एक ठार, वाहतूक खोळंबली
महाराष्ट्र मिरर टीम
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पुण्याहून मुंबई कडे जाणाऱ्या लेन वर अंडा पॉइंट जवळ भरधाव ट्रेलर चालकाला कंट्रोल न झाल्याने तो समोरील टेंपोवर जाऊन आदळला त्यात ट्रेलर चालक जागीच ठार झाला ,ट्रेलरची पाठीमागून टेम्पोला धडक बसल्याने टेम्पो ही उलटला,ही दोन्ही वाहने रस्त्यावर उलटल्याने वाहतुकीचा मात्र खोळंबा झाला असून अपघात ग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर येईल अस सांगण्यात आल आहे,खोपोली पोलिसांनी लागलीच घटना स्थळी धाव घेतली आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीला आणि इतर यंत्रणानी धाव घेऊन वाहतूक सुरुळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत . बेशिस्त वाहानचालकांमुळे वाहतुकीवर आणखीनच परिणाम झालेला दिसतो.