माथेरानच्या कार्यतत्पर मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे कर्जतच्या प्रभारी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार
चंद्रकांत सुतार-माथेरान
माथेरानमध्ये मुख्याधिकारी उपलब्ध नसताना कर्जत येथील मुख्याधिकार्यांनी माथेरान येथे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम नेहमीच पाहत आले आहेत पण यावेळी पहिल्यांदाच माथेरानच्या मुख्याधिकारी असलेल्या सुरेखा भणगे शिंदे ह्या कर्जतच्या प्रभारी मुख्याधिकारी हा पदभार सांभाळणार आहेत कर्जतचे मुख्याधिकारी पंकज पवार पाटील यांना वसई-विरार महानगरपालिकेमध्ये पदोन्नती मिळाली असून उपायुक्त पदावर ते रुजू होण्यासाठी 2 /5 /2022 ही तारीख देण्यात आली आहे त्यामुळे तातडीने कर्जतचे मुख्यअधिकारी हे पद खाली होणार असल्याने येथून जवळ असलेल्या माथेरानच्या मुख्याधिकार्यांना प्रभारी मुख्याधिकारी म्हणून आपले काम सांभाळून कर्जत नगरपालिकेचा कार्यभार सांभाळण्याचे आदेश जारी केले आहेत त्यामुळे आता माथेरानच्या मुख्याधिकारी यांच्याकडे माथेरान व कर्जत ह्या दोन्ही नगरपालिकांचा कार्यभार असणार आहे या नियुक्तीमुळे माथेरान मधून सर्व स्तरातील मंडळींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.