महाराष्ट्र दिनी आमदार महेंद्र थोरवे यांनी केले माणकिवली रस्त्याच्या नुतनीकरणाचे भुमीपुजन
सोहेल शेख - कर्जत
कडाव ग्रामपंचायतीच्या महाविकास आघाडीच्या व आमदार महेंद्र थोरवे ह्यांच्या सहकार्याने कडाव ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकासकामे करण्यात आली असुन काही कामे प्रगतीपथावर आहेत. आणि आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन लोकप्रिय कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे ह्यांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करत कडाव माणकिवली जोड रस्त्याच्या कामाचे भुमी पुजन करुन माणकिवली ग्रामस्थांना महाराष्ट्र दिनानिमित्त जणु अनोखी भेट दिल्याने माणकिवली ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसुन आले. मागील तीन ते चार दशकांपासुन खडतर रस्त्यावरून धडपडत, चिखल माती तुडवत जाण्याचा आम्हा ग्रामस्थांचा वनवास अखेर संपला असे म्हणुन आमदार महेंद्र थोरवे व कडाव ग्रामपंचायतीच्या महाविकास आघाडीचे गावातील ग्रामस्थ व सद्या बदलापुर येथे वास्तव्यास असलेले मधुकर पवार ह्यांनी आभार व धन्यवाद मानले.
सदर भुमी पुजन सोहळ्याप्रसंगी उपतालुकाप्रमुख बाबु घारे, संपर्क प्रमुख पंकज पाटील, विभाग प्रमुख शाम पवाळी, सरपंच अशोक पवार, उपसरपंच सुषमा चेतन पवाळी, माजी सरपंच फुलाजी पवार, माजी उपसरपंच किसन पवार, तंटामुक्ती अध्यक्ष हरेश मराडे, जेष्ठ शिवसैनिक भगवान बोराडे, बबन गुरव, जनार्दन दुघड, बाळु घरत, खरेदी विक्री संघाचे माजी उपसभापती रमेश सांगळे, विभाग प्रमुख प्रफुल म्हसे, शिव रणरागीनी हेमा पवाळी, वर्षा पवाळी, प्रणाली पालकर, वावळोली ग्रामपंचायतीचे सदस्य मिलिंद कडु, शिवसैनिक अरुण दुघड यांसह विश्वनाथ पवार, सदा गंगावणे, कुंडलिक गंगावणे, संजय गंगावणे, तानाजी गंगावणे, रवी गंगावणे, संतोष पवार, राजु पवार, रामदास गंगावणे, बाळा पवार, अंकुश गंगावणे, किरण गंगावणे, विक्रम गंगावणे आदिंसह मोठ्या प्रमाणात माणकिवली ग्रामस्थ उपस्थित होते.