टपाल पेटी ते लक्ष्मी हॉटेल पर्यंतच्या रस्त्यावर ड्रेनेज पाईप टाकण्याचे आमदार महेंद्र थोरवे यांचे एमएमआरडीएला आदेश
चंद्रकांत सुतार -माथेरान
एमएमआरडीएने दस्तुरी नाका ते पांडे प्लेय ग्राउंड ( शिवाजी महाराजांचा पुतळा) पर्यंत साडेपाच किलोमीटर रस्त्यावर पर्यावरण पूरक मातीच्या ब्लॉक्सचे काम प्रगतीपथावर आहे दस्तुरी नाका ते टपाल पेटी पर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे शुक्रवारी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी आमदार महेंद्र थोरवे यांची कर्जत येथे भेट घेतली.माथेरानमधील एम.एम.आर.डी.ए.च्या चालु असलेल्या मुख्य रस्त्याच्या कामाविषयी चर्चा केली.
आमदार महेंद्र थोरवे यांना मुख्य बाजारपेठेतील रेस्टाॅरंट, हाॅटेलधारक व घरांच्या मलनिस्सारण समस्यांविषयी सविस्तर माहीती दिली. आमदारसाहेबांनी त्वरीत सदर प्रकल्पावरील एम.एम.आर.डी.ए.चे कार्यकारी अभियंता श्री. अरविंद धाबे यांना सदर ड्रेनेज लाईनचे अंदाजपत्रक बनविण्यास सांगीतले व या चालु प्रकल्पामधेच सदर ड्रेनेज लाईनचे काम करण्यास सुचना केली आहे. त्यामुळे येणार्या काळात जेव्हा नगरपरिषदेचा प्रस्तावित मलनिस्सारण प्रक्रीया प्रकल्प (Sewage Treatment Plant) हाती घेण्यात येईल तेव्हा हा रस्ता या ड्रेनेजलाईनसाठी खोदावा लागणार नाही. टपालपेटी नाका ते लक्ष्मी हाॅटेल या भागात क्ले पेव्हर लावण्याचे कामावर एम.एम.आर.डी.ए. अंदाजे ८ ते १० कोटी रुपये खर्च करेल. एवढा मोठा निधी पुन्हा लगेच या कामासाठी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे ज्या त्रुटी राहील्या आहेत त्या दुरुस्त करणे आवश्यक आहेत.
सध्या या रस्त्याच्या दुतर्फा असलेले रेस्टाॅरंट, हाॅटेल आणि घरे यांचे ड्रेनेज व सेप्टीक टॅंक ओव्हरफ्लो हे अनेक ठिकाणी पावसाळी पाणीवाहुन नेण्याच्या गटारांमधे सोडले आहे.मागील अतिवृष्टीमधे मधुमालती हाॅटेल समोरील या गटारात सिवेजचे अनेक पाईप असल्यामुळे पाणी रेल्वे ट्रॅकने वाहत मोहल्ल्यामधे अनेक घरात घुसले व नागरीकांचे हाल झाले. मैला वाहुन नेणारी स्वतंत्र व्यवस्था तयार झाल्यावर सांडपाणी हे पावसाचे पाणी वाहुन नेणार्या गटारात जाणार नाही. त्यामुळे मुख्य रस्ता हा दुर्गंधी मुक्त होईल. सुशोभीकरणात 'ड्रेनेज सिस्टीम' योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे.