सुनील शिंदे यांचा हाथ रिक्षा अमानवी प्रथेच्या संघर्षाला अखेर यश!
सुप्रीम कोर्टाने ई रिक्षाला दिली मान्यता
चंद्रकांत सुतार --माथेरान
हाथ रिक्षा चालकांच्या दहा वर्षायाच्या संघर्षाला अभूतपूर्व यश मिळाल्याने आज माथेरान करणांसाठी सोन्याचा दिवस आहे . हाथ रिक्षा ह्या अमानवीय प्रथेतून मुक्ती रिक्षा संघटनेच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली न्यायाधीशांनी अशा प्रकारची व्यवस्था एकवीसव्या शतकात कशी सुरू राहू शकते असा जाब राज्य सरकारला विचारला
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पर्यटन स्थळ माथेरान येथे मानवी हाथ रिक्षाद्वारे पर्यटकांना ने आण सुरु असते , एक प्रकारे गुलामगिरीच्या प्रथेनुसार कायम सुटका मिळावी या साठी प्रदूषण मुक्त पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची बाधा न पोहोचवता शासनाने इ रिक्षा सुरू करावी ही मागणी साठी मागील दहा वर्षा पासून माथेरान येथील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुनील शिंदे हे शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत , राज्यातील अनेक मंत्र्यांना भेटी घेवून लेखी निवेदन सादर केली आहेत सनियंत्रण समिती जिल्हाधिकारी रायगड, पर्यावरण सचिव महाराष्ट्र, इको सेन्सिटिव्ह झोन, राज्य शासन , केंद्रीय पर्यावरण सचिव , आणि सुप्रीम कोर्ट असा मोठा प्रवास सातत्याने दहा वर्षे श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी सुनील शिंदे लढत राहिले ,आज ह्या संघर्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे, आज झालेल्ल्या सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान न्यायालयाने माथेरानमध्ये ई रिक्षा ला मान्यता दिली आहे, माथेरान करांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असेल या मुळे ई रिक्ष हाथ रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती मिळेल व शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग महिला यांची पायपीट वाचेल व येथील पर्यटनात क्रांती होईल हे नक्की!
आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ई रिक्षा चे स्वप्न बाळगलेले माथेरान कर अर्थात सुनील सर याचे सर्व स्थरातून कौतुक अभिनंदन होत आहे,