माथेरानमध्ये घोड्यांच्या तबेल्याला आग
चंद्रकांत सुतार - माथेरान
माथेरान मधील घोड्यांच्या तबेल्याला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. घोड्यांचे खाणे असलेले गवत हे तबेलात माळा करून ठेवण्यात आले होते , दुपारच्या सुमारास अचानक लाईट मीटर मधून शॉर्ट सर्किट होत गेले त्याच्या ठिणग्या गवतावर पडल्याने आग झपाट्याने वाढत गेली. माळ्यावरील सर्व गवत जळून खाग झाले असले तरी नशीब त्याचा जोर खाली असलेल्या गवतावर इतर साहित्य वर गेले नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, अचानक धुराचा लोढ आल्याने तेथे बाजूलाच प्रदीप घावरे , सुभाष , यांच्या लक्षात आल्याने प्रसंगसावधता दाखवत त्यांनी धावत जाऊन तबेल्यातील घोडे सोडून बाहेर काढले ,आग विझवण्याचा पर्यन्त केले , फायर ब्रिगेडला कळविण्यात आल्याने , लोकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
गुरुवारी 19 मे रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास जोरदार आग लागली. गवत असल्यामुळे आग झपाट्याने पसरत होती.लोकवस्ती असल्याने लोक जमा झाले आणि पटापट पाण्याने आग विझविण्यात आली. माजी नगरसेवक प्रदीप घावरे, अश्वपाल संघटनेचे उपाध्यक्ष गणेश घावरे, सचिव विकास रांजाणे व पालिका कर्मचारी विकास पार्टे यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अग्निशमन वाहनचालक अजिंक्य सुतार, अमोल सकपाळ आणि वसंत कडाळी यांनी अर्ध्यातासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.,