रायगड जिल्ह्यात रमझान ईदसाठी 150 अधिकारी सहित 1750 पोलीस कर्मचारी व होमगार्डचा बंदोबस्त
अमूलकुमार जैन- अलिबाग
रायगड जिल्ह्यात 3 मे रोजी मुस्लिम समाजाचा पवित्र सण रमजान ईद आणि हिंदू धर्मीय यांचा साडे तीन मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीया ही आहे.यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायगड जिल्हा पोलीस दल बंदोबस्तासाठी सज्ज झाला असून यामध्ये 150 पोलीस अधिकारी,1500 पोलीस कर्मचारी तर 250 होमगार्ड यांच्यासाहित इतर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मंगळवारी रमझान ईद हा मुस्लिम समाजाचा पवित्र सण उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हयातील 267 मशीद,ईदगाह आहेत.यावेळी ईद सोबत अक्षय तृतीया ही येत आहे.यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
या बंदोबस्त मध्ये सात स्ट्रायकिंग फोर्स,दोन आरसिपी, एक क्यूआरटी, दोन एसआरपी प्लॅटून ,150अधिकारी,1500 पोलीस कर्मचारी, तर 250 होमगार्ड यांचा समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले आहे.