Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अलिबागेत स्वच्छता व जनजागृती अभियान

 अलिबागेत स्वच्छता व जनजागृती अभियान

एक टन कचऱ्याचे होणार रिसायकालिंग

गुरुनाथ साठेलकर- खोपोली


गोकुळेश्वर मंदिर वेश्वि, अलिबाग तलावाच्या परिसरातील प्लास्टिक व कचरा अशी स्वच्छता मोहीम व जनजागृती अभियान दि 21मे 2022 रोजी माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर, रायगड जिल्हा परिषद  पाणी व स्वच्छता विभाग, आर.सी.एफ. थळ, आय ओ रा कॉटेजेस आणि वेश्वि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अंदाजे 1 टन प्लॅस्टिक कचरा गोळा करून रिसायकलिंग करीता पाठवण्यात आला.

   

 स्वच्छतेबाबत जागृकता करताना रायगड जिल्हा परिषद अलिबाग पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा समन्वयक जयवंत गायकवाड बोलताना सांगितले की नागरिकांनी  परिसरात प्लॅस्टिक, कचरा तसेच काचेच्या वस्तू, बॉटल्स टाकू नयेत कारण प्लॅस्टिक हे तीनशे ते चारशे वर्षे नष्ट होत नाही, ते जाळले तर श्वसनाचे विकार होतात, पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. ओला व सुका कचरा वेगळा करावा अशी नागरिकांना त्यांनी आवाहन केले.

    माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर  महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान,यांनी कचऱ्यामूळे आजार पसरतात त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवून निरोगी कसे राहता येईल व निसर्गाचा समतोल कसा राखला जाईल याबद्दल मार्गदर्शन केले.

आयओरा कॉटेज चे मालक व नॅचुरालिस्ट सागर म्हात्रे यांनी हवामान बदल/ ग्लोबल वार्मिंग याचे आरोग्यावर होणारा दुष्परिणाम चे दाखले, आणि माननीय चेन्नई हायकोर्ट यांनी नुकताच पृथ्वी ला जिवंत व्यक्ती ( entity) समजून, एखाद्या जिवंत व्यक्तीला दिला जाणारा सन्मान / दर्जा द्यावा जावा असा आदेश दिला  या बद्दल मार्गदर्शन केले.

वेश्वि सरपंच प्रफुल पाटील यांनी ग्रामपंचायत स्वच्छ ठेवण्याचे आश्वासन देऊन या कार्यात मोलाचा सहभाग दर्शविला. माणुसकी कार्याध्यक्ष तानाजी,सचिव विशाल, माणुसकी अलिबाग अध्यक्ष ऍड भूषण, सचिव वारगे , संपर्क प्रमुख ॲड. भूपेंद्र, सौ. पल्लवी,सौ. वारगे,अमोल भोईटे,विपुल,  विविध संघटनेतील सदस्य,  आर. सी.एफ. लि. अलिबाग चे आर. आर. कुलकर्णी , वाझे, सुनील ठोकळ आदी अधिकारी वर्ग , ग्रामविकास अधिकारी  दिवकर, निसर्गप्रेमी चांडवडकर ग्रामपंचायत कर्मचारी , व संपूर्ण माणुसकी टीम उपस्थित होती



.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies