उंब्रज ता कराड वीर महाराणा प्रताप यांची 482 वी जयंती उत्साहात साजरी!
कुलदीप मोहिते-कराड
यानिमित्त उंब्रज तालुका कराड येथे उंब्रज ग्रामस्थ उंब्रज ग्रामपंचायत वीर शिरोमणी महाराणा प्रताप समिती यांच्या वतीने उंब्रज बाजारपेठेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर वीर महाराणा प्रताप यांची 482 व्ही जयंती उत्साहपूर्ण व घोषणा मय वातावरणात साजरी करण्यात आली सकाळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक घालण्यात आला नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर वीर महाराणा प्रताप यांची प्रतिमा स्थापन करून त्याची विधीवत पूजा करण्यात आली यावेळी उंब्रज ग्रामपंचायत सरपंच माणिक जाधव माजीजिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव सुरेश साळुंखे शिवसेना विभाग प्रमुख संतोष बेडके महेश जाधव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
हिंदू एकता आंदोलन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विनायक पावस्कर यांच्या ही वतीने ही प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला वीर महाराणा प्रताप हे एक वीर राजपूत योद्धा व उत्तम युद्ध राज नीती कार होते प्रत्येक तरुणाने यांचा आदर्श घेतला पाहिजे ही काळाची गरज आहे असे गौरवोद्गार विनायक पावसकर यांनी यावेळी काढले अतिशय उत्साहपूर्ण व छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय जय श्रीराम या घोषणांमुळे उंब्रज बाजारपेठेतील परिसर दुमदुमून निघाला होता यावेळी उंब्रज ग्रामस्थ उंब्रज ग्रामपंचायत व प्रचंड प्रमाणात तरूण कार्यकर्ते उपस्थित होते