विसापूर गावावर शोककळा शहीद जवान विजय शिंदे यांच्यावर आज अंत्यसंस्कार
मिलिंदा पवार खटाव सातारा
सुभेदार विजय सर्जेराव शिंदे हे सन 1998 मध्ये 22 मराठा लाईट इन्फंट्री मध्ये लष्करी सेवेत रुजू झाले 24 वर्षाच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाचे संरक्षण केले. लष्करात सध्या त्यांचे पोस्टींग लेह लडाख येथे . सुभेदार पदावर ते कार्यरत होते जवानांचे परता पुरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हानिफ च्या फॉरवर्ड कडे जात असताना शुक्रवारी सकाळी नऊ वाजता लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून शोक नदीत पडले. या अपघातात सात सैनिकांना वीरगती मिळाली त्या सुभेदार विजय शिंदे यांचा समावेश आहे शहीद विजय शिंदे यांचे पार्थिव शनिवारी सकाळी लेह_लडाखमधून दिल्ली येथे दुपारी तीन वाजता पोचले दिल्ली विमानतळावर वीरगती प्राप्त ७ जवानांना लष्कराने मानवंदना दिली. त्यानंतर रविवारी पहाटे दिनांक 29 रोजी सकाळी दहा वाजता विसापूर येथे पोहोचणार आहे शिंदे यांचे निवासस्थानी कुटुंबीय नातेवाईक दर्शनासाठी संपूर्ण गावातून सजवलेल्या रथातून मंदिराशेजारील चौकात सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे शहीद विजय शिंदे यांच्या कुंभार की शिवारातील शेतात अंत्यविधी कार्यक्रम होईल अशी माहिती विसापूरच्या ग्रामस्थांनी दिली आहे.