खुटारवाडी आदिवासी वस्तीच्या रस्त्याची अवस्था बिकटच?
सुधाकर वाघ-@मुरबाड
मुरबाड तालुक्यातील खोपिवली ग्रामपंचायत हद्दीतील खुटारवाडी या आदिवासी गावात जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. खुटारवाडी गावात जाणारा डांबरी रस्ता देहरी गावातुन जातो. दवाखान्यात, बाजारपेठेत जाण्यासाठी हा एकच पर्यायी डांबरी रस्ता आहे.मात्र या रस्त्यावर नावालाही डांबर उरला नसल्याचे चित्र दिसत आहे. रस्तावर खडीच दिसत असल्याने मोटारसायकलीचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
अनेक राजकारणी लोकांकडे स्थानिक आदिवासींनी व्यथा मांडली परंतु कोणी लक्ष देत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या देहरी- खुटारवाडी रस्त्याची अवस्था बिकट झाली असल्याचे नागरिक सांगतात. तसेच खोपीवली ते खुटारवाडी या रस्त्यावरही लाखो रुपये खर्च करुनही या ही रस्त्याची अवस्था बिकटच आहे. त्यामुळे या आदिवासींनी प्रवास कसा करायचा असा प्रश्न निर्माण होत आहे.
खोपिवली ते खुटारवाडी रस्ता कधी होईल? हा रस्ता पुर्ण झाला तर आम्हा लोकांना खुपच सोईस्कर होईल. तसेच देहरी- खुटारवाडी या रस्त्यावर जवळपास 10 ते 12 वर्षा पुर्वी डांबरीकरण झाले होते पण आता या रस्त्याची अवस्था बिकट झाल्यााने मोटार सायकल वर दवाखान्यात, बाजारपेठेत ये- जा करत असतांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ..
....प्रियंका सुधाकर वाघ, माजी सरपंच खोपिवली-खुटारवाडी