पेज नदीत अडकलेल्या रत्नागिरीच्या आठ तरुणांना वाचवण्यात वैजनाथ ग्रामस्थांना यश
Team Maharashtra Mirror6/19/2022 07:32:00 AM
0
पेज नदीत अडकलेल्या रत्नागिरीच्या आठ तरुणांना वाचवण्यात वैजनाथ ग्रामस्थांना यश
आदित्य दळवी - कर्जत
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील गायक शंकर महादेवन यांच्या फार्म हाऊसच्या पाठीमागे असलेल्या पेज नदीच्या बंधाऱ्यावर रत्नागिरीचे आठ तरुण टाटा कंपनीचे वीज जनरेशन सुरू झाल्याने अचानक पेज नदीला पाण्याची पातळी वाढली आणि बंधाऱ्यावर बसलेले आठ तरुण अडकून राहिले ,ही बाब अमित गुरव आणि सूरज गुरव नरेश शिंदे सुरज गुरव,नरेश शिंदे, प्रशांत बार्णे, सरदार कावळे, गणेश भोसले, शरद पवार या ग्रामस्थाच्या लक्षात आल्याने त्याने गावातील तरुणांना घटनास्थळावर बोलावून घेतले आणि तरुणांनी पाण्यात उतरून दोराच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले.