काशीद समुद्रात बुडून एकाचा मृत्यू
अमूलकुमार जैन-@अलिबाग
रायगड जिल्ह्यतील प्रसिद्ध असलेल्या काशीद समुद्रात पुणे जिल्ह्यातुन आलेल्या पर्यटकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.
पुणे येथून मयत अँथॉनी पॉवेल(वय 29 वर्षे,राहणारखराळ वाडी पिंपरी चिंचवड, जि-पुणे),सूरज प्रकाश पाटील(वय 29राहणार-काळेवाडी,नडेनगर,पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे) हे त्यांच्या मित्रांसाहित पर्यटनासाठी मुरूड तालुक्यातील काशीद समुद्र किनारी आले होते.अँथॉनी पॉवेलआणि त्याचे मित्र दुपारच्या सुमारास काशीद समुद्राच्या पाण्यात स्नानासाठी गेले असता पॉवेल हा समुद्रात पोहत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात खोलवर गेला असल्याने त्याचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला .त्याचा मृतदेह जवळपास दोन तीन तासानंतर काशीद समुद्र किनारी आढळून आला.सदर घटना स्थळी सहाय्यक फौजदार राऊत यांनी भेट दिली .
याबाबत मुरूड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुदेश वाणी करीत आहेत