तुंगीत आमदारांचा विकास कामांचा धडाका !
दिनेश हरपुडे- कर्जत
- तुंगी येथे नवीन अंगणवाडी बांधणे.
- तुंगी येथे स्मशानभूमी बांधणे.
- तुंगी येथे प्राथमिक शाळा दुरुस्ती करणे.
आमदार महेंद्र थोरवे सातत्याने विकासात्मक कामे करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार झाल्यानंतर आज प्रथमच तुंगी गावास भेट दिली. याच भेटी दरम्यान आज तुंगी येथील विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन केलं..
तुंगी येथे नवीन अंगणवाडी बांधणे. ८.५० लक्ष
तुंगी येथे स्मशानभूमी बांधणे. १०.०० लक्ष
तुंगी येथे प्राथमिक शाळा दुरुस्ती करणे. २ लक्ष
आदी कामांचा समावेश आहे.
या भेटी व भूमिपूजन प्रसंगी उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, कर्जत विधानसभा संघटक संतोष भोईर, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे,कर्जत तालुका संघटक शिवराम बदे, तालुका अधिकारी अमर मिसाळ, उपतालुका प्रमूख भरत डोंगरे, उप तालुका अधिकारी प्रसाद थोरवे, विभाग प्रमुख प्रशांत झांजे, भानुदास राणे, रवी ऐनकर व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तुंगी येथील ग्रामस्थ उपस्थित होते...