मावळ मतदारसंघातील सर्व दिव्यांग यांना लाभ देण्यासाठी कटिबध्द.... खासदार श्रीरंग बारणे
खासदार निधीतून ई वाहने खरेदी करण्याची घोषणा
ज्ञानेश्वर बागडे -@कर्जत
मावळ लोकसभा मतदारसंघातील कोणताही दिव्यांग हा त्याच्या शारीरिक अवयव मुळे कायमचा अपंग राहणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि मागील पाच वर्षाप्रमाणे आगमी काळात दिव्यांग व्यक्ती यांची सेवा करण्याचे काम करण्यासाठी कटिबध्द आहोत अशी ग्वाही खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.दरम्यान, आतापर्यंत 2 हजार दिव्यांग यांना साहित्य वाटप केले असून या दिव्यांग व्यक्तींसाठी सतत धावपळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या खासदार निधीमधून ई वाहने दिली जातील आणि त्यातील एक ई वाहन अपंग संस्थेचे अध्यक्ष समीर साळोखे यांना दिले जाईल अशी घोषणा बारणे यांनी या कार्यक्रमात केली.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सवलती, साहित्य यांची नावनोंदणी शिबिराचे उद्घटन कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात खासदार श्रीरंग बारणे यांचे हस्ते झाले, त्यावेळी कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी,शिवसेनेचे उप तालुका प्रमुख बाबू घारे,कर्जत शहर प्रमुख भालचंद्र जोशी,युवा सेनेचे रायगड जिल्हा युवा अधिकारी मयूर जोशी,विधानसभा मतदारसंघ सचिव प्रथमेश मोरे,शिव सहकार सेनेचे कर्जत तालुका अध्यक्ष मिलिंद विरले, शिवसेनेचे विभागप्रमुख योगेश दाभाडे,बजरंग दळवी,कर्जत नगरपरिषद मधील नगरसेवक विवेक दांडेकर,नगरसेविका प्राची डेरवनकर,संचीता पाटील,माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यासह दिनेश भोईर,अपंग संस्था अध्यक्ष अमर साळोखे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रमासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग यांनी नावनोंदणी करण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आज 10जून रोजी करण्यात आले.यावेळी कर्जत आणि खालापूर तालुक्यातील 270 दिव्यांग यांनी नावनोंदणी केली,तर ज्यांना आज कर्जत येथे नाव नोंदणी करता आली नाही,त्यांनी सोमवारी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित राहावे असे आवाहन अपंग संघटनेचे अध्यक्ष अमर साळोखे यांनी केले आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीना साहित्य वाटप गेली पाच वर्षे सतत करीत आलो आहोत.आपल्या लोकसभा मतदारसंघात दोन हजाराहून अधिक दिव्यांग यांना साहित्य दिले आहेत.या माध्यमातून चांगली सुविधा केंद्राच्या सामजिक न्याय विभागाच्या दिव्यांग व्यक्ती यांना आधार देण्याचे काम केले आहे.कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्व दिव्यांग यांनी आपली गरज लक्षात घेवून त्यांची माहिती नोंदणी अर्जात नोंद करावी आणि त्यामुळे त्या सर्वांना संबंधीत साहित्य उपलब्ध करून देता येईल.खासदार बारणे यांनी पुढे बोलताना आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार निधी मधून आठ ई वाहने देण्याची घोषणा केली.यावेळी खासदार बारणे यांनी रायगड जिल्ह्यात अपंग सेवा संस्था म्हणून धावपळ करणारे अमर साळोखे यांना इलेक्ट्रिक व्हेईकल आपल्या खासदार निधी मधून देणार असल्याची घोषणा यावेळी केली. पुढील आठ दिवसात मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदार संघ येथे दिव्यांग व्यक्ती यांची नाव नोंदणी केली जाईल आणि ही नोंदणी केंद्र सामाजिक न्याय विभागला सुपूर्द केली जाईल.त्यानंतर पुढील दोन महिन्यांनी त्या सर्व वस्तूंचे वाटप हे सामजिक न्याय विभागाच्या मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत असा कार्यक्रम घेतला जाईल आणि साहित्य वाटप केले जाईल असे खासदार बारणे यांनी जाहीर केले. कर्जत नगरपरिषदेचा अध्यक्षा सुवर्णा जोशी यांचेही यावेळी भाषण झाले.