माथेरान मध्ये जमिनीची धूप पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याची काळाची गरज
चंद्रकांत सुतार --माथेरान
माथेरान हे पर्यटन स्थळ हे घनदाट जंगल लाल मातीचे रस्ते ,शुद्ध हवामान ,म्हणून प्रसिद्ध आहे समुद्र सपाटी पासून 800 मीटर उंचावर डोंगराच्या माथ्यावर वसलेले माथेरान , सर्वत्र उंच डोंगर व हिरवेगार घनदाट झाडे यामुळे येथे पावसाचे प्रमाण अधिक असते, दर वर्षी पावसाचे प्रमाण अधिक किंवा अति वृष्टीच असते ,माथेरान ला पडत असलेल्या पावसामुळे येथील जमीन व झाडांच्या मुळाशी असलेल्या मातीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे दर वर्षी किमान आठ ते नऊ इंच इतकी जमिनीची धूप होत आहेत
परंतु या वर ठोस उपाययोजना करण्यात आली नाही, पावसाळा आला की विविध माध्यमातुन वृक्षारोपण माथेरानला होत असते, परन्तु संगोपन संवर्धनाच्या नावे मात्र उदासीन ता दिसून येते , सद्या माथेरान मध्ये जुने रस्ते कात टाकून नवीन क्ले पेव्हर ब्लॉक चे रस्ते होत आहेत त्या मुळे रस्त्यावर घोड्याच्या लिदचे प्रमाण अधिक आहे मेन बझार पेठ सोडली तर इतर ठिकाणीचे लिद कचरा हा त्याच ठिकाणी रस्त्याबाहेर टाकला जातोय त्यामुळे दस्तुरी ते टपाल पेटी नाका ह्या दोन्ही बाजूला असले छोटी मोठी झाडे दिंडा, अडुळसा, बोकडा, पिसा या सारखी झाडे पूर्णपणे नामशेष होऊन गेली आहेत पूर्वी रस्त्याच्या बाजूने समोरचे काही दिसत नसे पण आता सर्वत्र मोकळे झाल्याने तो तो परिसर भकास दिसत आहे, मोठा पाऊस , जमिनीची धूप, झाडांच्या मुळाशी टाकले ला लीद मिश्रित कचरा या चा परिणाम मोठं मोठे झाडे उन्मळून पडत आहेत, या सर्व गोष्टी चा गंभीरपणे विचार करून वन विभागाने या बाबत वृक्षारोपण बरोबर वृक्ष संवर्धन ,धूप प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या पाहिजे ,शरलोट लेक येथे ज्या प्रमाणे धूप प्रतिबंधक केले आहे त्या प्रमाणे व ठीक ठिकाणीपाण्याचा प्रवाह आहे तिथे बंधारे ,तसेच झाडाभोवती दगडी कठडे महत्वचे जनजागृती होणे गरजेचे आहे,
२००५ साली २६ तारखेला महाप्रलयकारी पावसाने सर्वत्र सर्वत्र हाहाकार माजवला त्यात माथेरान येथे सखाराम तुकाराम पॉईंट , गारबट पॉईंट पेनोरंमा पॉईंट रेल्वे भाग , डेंजर पाथ , या सर्व ठिकाणी मोठे उत्खलन झाले होते, यात हजारो झाडे वाहून गेली होती, निसर्गाचा प्रकोप तर होत असतो परन्तु त्यावर उपयोजना खबरदारी स्थानिक पातळीवर प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे
आवश्यक खबरदारी
- ▪️उतार रत्यावर पावसाळ्यात मजबूत बंधारे टाकणे
- ▪️महत्वचा रस्त्यावर पावसाळ्यात पालापाचोळा अंथरने
- ▪️आवश्यक ठिकाणी धुप प्रतिबंधक उपाय योजना करणे
- ▪️मोठ्या झाडाना सुरक्षिततेंसाठी कठडे बांधणे
- ▪️ वाळवी प्रतिबंधक फवारणी करणे