माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर !
चंद्रकांत सुतार-@माथेरान
महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियम २०१४ च्या नियम १८ व १९ प्रमाणे अधिकाराचा वापर करून आणि मा. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व मा. तालुका सहकारी निवडणूक प्राधिकरण तथा सहायक निर्बंधक ,सहकारी संस्था कर्जत, जि.रायगड यांनी जाहीर केलेल्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळ सदस्यांच्या निवडणुकी करिता शा. प्र.कपोते निवडणूक निर्णय अधिकारी तथा लेखापरीक्षण सहकारी संस्था तालुका कर्जत ,जि. रायगड यांनी माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून दि.११ जुलै २०२२ रोजी या संस्थेची निवडणूक घेण्यात येणार आहे त्याबाबतची आवश्यक माहिती संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादी सुध्दा संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध होणार आहे आणि याच नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केलेल्या चिन्हांच्या यादीमधून संस्थेच्या सदस्य उमेदवारांना चिन्हे निवडायची आहेत. नामनिर्देशन पत्राचीछाननी केल्यानंतर त्याची प्रसिद्धी मतदान व मतमोजणीचे दिवस वगळून निवडणूक कार्यक्रम शासकीय व सार्वजनिक सुट्ट्या खेरीज सुरू राहणार असल्याचे शा. प्र.कपोते निवडणूक निर्णय अधिकारी तथा लेखापरीक्षण सहकारी संस्था तालुका कर्जत ,जि. रायगड यांनी तसेच बालाजी कटकदौंड तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहायक निर्बंधक सहकारी संस्था कर्जत यांनी निवडणूक कार्यक्रम पत्रिकेत जाहीर केले आहे.
----------------------------------------------
एकूण तेरा जागांसाठी ही मतदान प्रक्रिया असणार आहे यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघासाठी ८ जागा आहेत तर अनुसूचित जाती जमाती राखीव १ जागा आहे.महिलांसाठी राखीव २ जागा, इतर मागासवर्गीय राखीव १ जागा आणि भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागासप्रवर्गासाठी १ जागा असणार आहे.
----------------------------------------------
नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटची तारीख (ज्या जागी नामनिर्देशन पत्र मिळतील ती जागा) दि. ९ जून ते १५ जून २०२२ सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत (निवडणूक कार्यालयात ).
नामनिर्देशन पत्राच्या यादीचे प्रकाशन हे जसजशा याद्या प्राप्त होतील त्याप्रमाणे दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयात.
नामनिर्देशन पत्राच्या छाननीची तारीख १६ जून २०२२ निवडणूक कार्यालयात.
विधिग्राह्य नामनिर्देशन पत्राची सूची प्रसिद्ध करण्याची तारीख १७ जून २०२२ निवडणूक कार्यालयात सकाळी अकरा वाजता.
उमेदवारी मागे घेण्याची तारीख १८ जून २०२२ ते दि. ४ जुलै २०२२ सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयात.
उमेदवारांना निशाणीचे वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन दि.५ जुलै रोजी संस्थेच्या नोटीस बोर्डावर दुपारी चार वाजेपर्यंत.
मतदान ११ जुलै ह्या तारखेला कम्युनिटी सेंटर माथेरान येथे सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.
मतमोजणी त्याच दिवशी म्हणजे दि.११ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच एक तासाने कम्युनिटी सेंटर येथे घेण्यात येणार आहे. आणि त्याचवेळी मतदानाचा निकाल मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच मतमोजणी केंद्रावर घेण्यात येणार आहे.
----------------------------------------------
आजपर्यंत माथेरान नागरी पतसंस्थेचा कार्यभार उत्तम प्रकारे सुरू असून संस्थेचे सचिव योगेश जाधव यांनी पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीचा, वसूलीचा आलेख चांगल्या पद्धतीने उंचावला आहे.संस्थेचे ठेवीदार, सभासद, नियमित व्यवहार करणारे दैनंदिन ठेवी धारक, संचालक मंडळाच्या सहकार्याने सर्व व्यवहार सुस्थितीत आहेत.