कर्जत खालापूर तालुक्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर कलम 144 लागू
उपविभागीय अधिकारी यांनी घेतला निर्णय
महाराष्ट्र मिरर टीम
कर्जत आणि खालापूर तालुक्यातील विविध पर्यटन स्थळे नेहमीच पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतं असतात.मात्र पर्यटक खबरदारी घेऊन पर्यटन करत नसल्याने जीवितहानी आणि अनुचित प्रकार घडत असल्याने या दोन्ही तालुक्यातील धबधबे,तलाव, धरणं,आणि विविध पॉईंट्सवर हे प्रतिबंधात्मक आदेश प्रशासनाने जारी केले आहेत.आता हुल्लडबाजी आणि जीवाशी खेळून पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांवर चाप बसणार आहे.
या प्रतिबंधात्मक आदेशात एकूण 16 नियम असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असून लवकरच यासाठी पथके तैनात होतील अशी माहिती मिळत आहे. 10 जूनपासून 9 ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
काय आहेत हे प्रतिबंधात्मक आदेश
- - धबधबा परिसरात मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनाधिकृत मद्यविक्री आणि उघड्यावर मद्य सेवन करणे
- - पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी फोटोग्राफी सेल्फी अगर चित्रीकरण करण्यास मनाई आहे.
- - पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात आणि खोलपाण्यात उतरून पोहण्यास बंदी घालण्यात आली आहे
- - धबधब्यावर जाणे अगर पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे
- - सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत तलाव,धबधबा आदी ठिकाणी पाण्यात उतरणे
- - वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे
- - अतिवेगाने वाहन चालवणे तसेच वाहतुकीवर परिणाम अडथळा होईल असे वाहन चालवणे.
- - बेदरकारपणे वाहन चालवून ओव्हरटेक करणे
- - सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ ,कचरा, काचेच्या बाटल्या व तत्सम इतर साहित्य उघड्यावर टाकने
- - सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे,अश्लील हावभाव आणि शेरेबाजी किंवा लज्जा निर्माण होईल असे कृत्य किंवा वर्तन
- - ध्वनी प्रदुषण करणे, डिजे,संगीत यंत्रणा वाजवणे,स्पीकर/वूफर वाजवणे
- - धबाधबा,तलाव ,धरणं परिसरात 1किमी परिसरात सर्व दुचाकी,चार चाकी सहा आसनी वाहनांना प्रवेश( अत्यावश्यक सेवा वगळून)
- - कोरोना प्रादुर्भावामुळे सोशल डीस्टनसिंग पालन करणे
कुठली ठिकाणे आहेत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.
कर्जत-
पाली भुतीवली धरणं, बेडीसगाव धबधबा, वदप धबधबा, बेकरे कोल्हा धबधबा, सोलनपाडा धरणं, कोंबलवाडी धबधबा, डोंगरपाडा धबधबा, टपालवाडी धबधबा,अवसरे धरणं, खांडस धरणं, साळोख धरणं , पाषाणे धरणं
खालापूर-
डोणवत धरणं, मोरबे धरण,बोरगाव धबधबा, नढाळ धरणं, पळसाचा बंधारा,धामणी कातकरवाडी धबधबा, पोखरवाडी धबधबा, झेनिथ धबधबा, भिलवले धरणं, वावर्ले बंधारा,आडोशी धबधबा आणि पाझर तलाव, माडप धबधबा, कलोते धरणं.