जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माणुसकी प्रतिष्ठान व गोल्ड कोस्ट को ओ हा सोसा.ने सीड बॉल तयार केले सीड बॉल
अमूलकुमार जैन-अलिबाग
याचा विचार करून माणुसकी प्रतिष्ठान शाखा अलिबाग व गोल्ड कोस्ट को. ओ. हा. सोसा. अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बॉल बनविण्यात आले, यामध्ये आपण जी फळे खातो त्यांच्या बिया इतरत्र न टाकता त्यांचा संचय करून त्या सुकवून घेऊन, नंतर माती व शेणखत किंवा गांडूळ खत एकत्र करून त्यामध्ये सुकलेल्या बिया एकत्र करून लाडू सारख्या आकाराचे सीड बॉल तयार करून ते पुन्हा सुकवावे. सुकल्यानंतर हे सीड बॉल पाऊस पडून गेल्यावर जंगल किंवा माळरानात सॊडून द्यायचे. काही दिवसांनी त्याला अंकुर फुटून वृक्षात रूपांतर होईल. या सीड बॉल मुळे यातील बिया खराब होत नाहीत .
अशाच प्रकारे इतरही संस्था किंवा सोसायटी एकत्र येऊन सीड बॉल तयार करून निसर्गात वृक्षांची लागवड करावी व डोंगरांची धूप थांबण्याचे एक प्रकारे प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान यांनी सोसायटीच्या सर्व लहान मुलांना सीड बॉल कसे बनवायचे व याचे महत्त्व सांगून प्रत्यक्ष 550 सीड बॉल सर्वांनी बनवले. लहान मुलांना आतापासूनच सामाजिक कार्याची गोडी कशी लागेलं याबद्दल मार्गदर्शन केले.गोल्ड कोस्ट सोसा.शिवनगर चेंढरे मधून अध्यक्ष योगेश घरत व टीम तसेच माणुसकी प्रतिष्ठान शाखा अलिबाग कडून अध्यक्ष भूषण जंजिरकर ,उपाध्यक्ष श्वेता घरत , खजिनदार गौरव माळी, संपर्क प्रमुख भुपेंद्र पाटील, वसंत जंजिरकर व सोसायटीमधील लहान मुले उपस्थित होती.