कितीही संकट आले तरी तो वाकणारा शिवसैनिक नाही:-खासदार संजय राऊत
अमूलकुमार जैन- अलिबाग
यावेळी व्यासपीठावरमाजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी आमदार मनोहर भोईर,बबन पाटील, विलास चावरी,रायगड जिल्हा संपर्क प्रमुख किशोर जैन,जिल्हाप्रमुख सूरेंद्र म्हात्रे,अनिल नवगणे शीतल म्हात्रे यांच्यासाहित आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार संजय राऊत यांनी सांगितले की,मला गप्प कसा करता येईल यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते प्रयत्न करीत आहे.मी कोणालाही घाबरणारा नाही आहे. कारण मी हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट सैनिक आहे.मी अलिबाग येथे मेळावा घेण्यासाठी येवु नये म्हणून इडी ची नोटीस काढली मात्र मी जाहीर केले होते की,अलिबागच्या मेळाव्यावला मी येणार आहे .मग मला भलेही अटक व्होवो.कितीही संकटे आली तरी सच्चा शिवसैनिक हा कुठल्याही संकटाला सामोरे जातो. जे पळून गेलेत आहेत त्यांच्या मागे कोणत्याही प्रकारची चौकशी लागू नये म्हणून पळून गेले आहेत. महेंद्र दळवी किंवा महेंद्र थोरवे यांचा धंदा काय तर मुंबईतील नट नट्यानां जागा खरेदी करून द्यायची आणि तत्याजागेत डेव्हलपमेंट करून भक्कम पैसे कमवायचे.यांच्याकडे कधीही शिवसेनेची निष्ठा नव्हती.त्यांच्यामुळे सच्चा शिवसैनिक यांच्यावर अन्याय झाला आहे.त्याला आमदारकीचे तिकीट मी उद्धव ठाकरे यांना सांगून देण्यास लावले.विधान परिषदच्या निवडणूकहा महेंद्र हा स्ट्रेचर घेऊन आला तेव्हा त्यांनी रायगडची मान उंचावली मात्र निवडणूक झाल्यानन्तर तो रिक्षावाला सोबत हिंदुत्व धोक्यात आहे म्हणून पळून गेला जे पळून आमदार गेले आहेत त्यांची अवस्था आज भाजपच्या पिंजऱ्यात असणाऱ्या शेळी सारखी झाली आहे.आनंद दिघे जाऊन तेवीस वर्षे झाली या महाडच्या आमदार याला माहिती आहे की आनंद दिघे काय होते.अलिबाग मतदारसंघाचे शिवसेनेचे आ. महेंद्र दळवी पळून गेले आहेत. बारा पक्ष फिरुन आलेल्या दलबदलू दळवीला कसले आले हिंदूत्व. त्यांच्या जाण्याने खर्या अर्थाने येथील शिवसेना, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. दळवी म्हणजे 100 गोठ्यातून शेण खाऊन आलेला बैल आहे. आता या बैलाला बदलायची वेळ आली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच शिवसेनेची फसवणूक करणार्यांना फटके देण्याची वेळ आली आहे. अलिबागच्या आमदाराला आता कुलाबा किल्ल्यातून समुद्रात फेकून देण्याची वेळ आली आहे.हिम्मत आणि बहुमत असेल तर लपून बसायची वेळ का आली? असा सवाल खा. संजय राऊत यांनी अलिबागमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात उपस्थित केला.
माजी खासदार अनंत गीते यांनी सांगितले की यापुढे रायगडचे राजकारणाला मी नवी दिशा देईन. अलिबागच्या आमदाराला तिकिट देण्यापासून सर्व प्रयत्न केले मात्र तो गद्दार निघाला.अलिबाग आमदार असो की कर्जतचा आमदार असो त्यांनी पक्ष वाढविण्यापेक्षा स्वतःची भाकरी भाजत फक्त समर्थक वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदार यांनी लोकांची जमवाजमव केली.त्यावेळी त्यांच्या बँनर वर माझा देखील फोटो लावला आहे.ठाण्याच्या दाधिवाला याला कधी आनंद दिघे यांची आठवण आली नाही मात्र आता त्यांच्या नावाने राजकारण करीत आहेत. आज आनंद दिघे हे जिवंत असते तर त्या गद्दारला चप्पलने मारले असते.महाडचा आमदार काय किंवा दाढीवाला काय आनंद दिघे यांची नक्कल करत बगलेत रुमाल ठेवत वाकून नमस्कार करीत फिरत असतो.अलिबागचा आमदार त्याला जिल्हाप्रमुख केले त्याची बायको जिल्हा परिषद सदस्य तिला जिल्हापरिषदेचा अध्यक्ष करायचे म्हणून प्रत्येक सदस्य याला काहींना काही आमिष दाखवीत होता.मात्र त्यात यश आले नाही म्हणून तिला पक्षाचा गटनेता बनविले.सर्वच पदे घरात ठेवून घेण्याचा त्याचा प्रयत्न होता.महाडच्या दाढीवाल्याला तीनवेळा आमदार केले,जिल्हा परिषदेचा सदस्य केला सभापती पद दिले. मात्र त्यानी गद्दारी केली आहे. आता या भुतांना बाटलीत बंद करून ठेवण्याची वेळ आली आहे. रायगडचे तीन,रत्नागिरीचे दोन आणि सिंधुदुर्ग येथील एक असा सहा गद्दाराचा कडेलोट करण्याची वेळ आहे.यापुढे रायगडचे राजकारण अनंत गीते ठरविणार असे म्हणत त्यांनी बंडखोर यांचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी माजी आमदार मनोहर भोईर,बबन पाटील,किशोर जैन,आणि सुरेंद्र म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त करीत बंडखोराचा समाचार घेतला.यावेळी बंडखोर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी सूत्रसंचालन बोर्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच नौशाद दळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन अलिबाग तालुक्याचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख महेश गुरव(शंकर)याने केले.